सटाणा : छावा मराठा संघटनेने शेतकरी मेळाव्यात मांडल्या समस्या
By admin | Published: August 31, 2016 11:48 PM2016-08-31T23:48:01+5:302016-08-31T23:48:42+5:30
कांद्याला हमीभाव देण्याची मागणी
सटाणा : शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंगल कार्यालयात बागलाण तालुका छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
अशा परिस्थितीत सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत छावा सैनिकांनी अत्याचार करणाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना जुमानू नका, असा सल्ला उपस्थित शेतकऱ्यांना दिला. आगामी काळात कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये हमीभाव द्यावा, शेतीला मोफत वीज, मराठा आरक्षण या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बागलाण तालुका मराठा युवा संघटनेच्या वतीने तालुकाप्रमुख संदीप सोनवणे, शहरप्रमुख योगेश सूर्यवंशी यांच्या हस्ते राष्ट्रीय अध्यक्ष जावळे पाटील यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्रबापू पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार, जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील, छावाचे जिल्हाध्यक्ष आशिष हिरे, शरद शिंदे, खालचे टेंभेचे सरपंच भाऊसाहेब अहिरे, नगरसेवक काका रौंदळ, माजी नगरसेवक सुनील मोरे, मविप्रचे संचालक भरत कापडणीस, बाजार समितीचे सभापती रमेश देवरे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, विलास दंडगव्हाळ, उपसभापती वसंत
भामरे, मिलिंद शेवाळे यांच्यासह शेतकरी, छावा सैनिक उपस्थित होते.(वार्ताहर)