सुरगाणा तालुक्यात संततधार; जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 01:33 AM2022-07-11T01:33:38+5:302022-07-11T01:34:10+5:30
सुरगाणा : तालुक्यात गेल्या तीन- चार दिवसांपासून संततधार सुरू असून लहान-मोठे नदी-नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे नार, पार, अंबिका, वाझडी, तान, मान, कावेरी तसेच पिंजाळ, दमणगंगा या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. या पावसामुळे रस्ते, भात आवणातील शेतीचे बांध यांचे खूप नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळली तर अनेक रस्ते, फरशी पूल, मो-या पाण्याखाली गेल्या आहेत. उंबरठाण वांगणबारीत दरड कोसळल्याने बर्डीपाडा ते रघतविहीर या गुजरात सीमेलगतच्या २० ते २५ गावांचा संपर्क काही काळ तुटला होता.
सुरगाणा : तालुक्यात गेल्या तीन- चार दिवसांपासून संततधार सुरू असून लहान-मोठे नदी-नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे नार, पार, अंबिका, वाझडी, तान, मान, कावेरी तसेच पिंजाळ, दमणगंगा या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. या पावसामुळे रस्ते, भात आवणातील शेतीचे बांध यांचे खूप नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळली तर अनेक रस्ते, फरशी पूल, मो-या पाण्याखाली गेल्या आहेत. उंबरठाण वांगणबारीत दरड कोसळल्याने बर्डीपाडा ते रघतविहीर या गुजरात सीमेलगतच्या २० ते २५
गावांचा संपर्क काही काळ तुटला होता. दिवसभर बारीतील मैला हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करून रस्ता मोकळा करण्यात आला. तर दुसरीकडे बा-हे भागातील ठाणगाव ते कोडीपाडा घाटात दरड कोसळल्याने त्या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कार्यवाही केली. अंबाठा ते खुंटविहीर, पिंपळसोंड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याच पाण्याखाली गेल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. अंबोडे ते बा-हे रस्ता पाण्याखाली गेला असून रस्त्यावरील पावसाचा अंदाज येत नसल्याने वाहन चालवणे मुश्कील झाले आहे.
भिवतास धबधबा पाहण्यासाठी पर्यटक भेट देत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. फरशी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पिंपळसोंड ते खुंटविहीर, शिराळा ते अळीवपाडा, उंबरवाडा( सु), दोडीपाडा, म्हैसखडक, बोरचोंड, कुकुडमंडा, पळसन ते वाघाडी, आमदा ते वांगण, वाजवड ते उंबुरणे आदी गावालगत रस्ते पाण्याखाली जात असल्याने पाणी ओसरेपर्यंत संपर्क तुटत असतो. या ठिकाणी पूल होणे गरजेचे आहे.