संताजी महाराज पुण्यतिथि : तब्बल तीन तास अश्वरथातुन शोभायात्रा घोटीत रंगला कीर्तन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:53 PM2017-12-16T23:53:30+5:302017-12-17T00:20:29+5:30
संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथि सोहळ्यानिमित्ताने घोटी शहर तेली समाज बांधव व संताजी युवक मंडळाच्या सहयोगातून आज संताजींच्या मुर्तीची घोटी शहरातून अश्वरथातुन शोभायात्रा काढण्यात आली .
घोटी : संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथि सोहळ्यानिमित्ताने घोटी शहर तेली समाज बांधव व संताजी युवक मंडळाच्या सहयोगातून आज संताजींच्या मुर्तीची घोटी शहरातून अश्वरथातुन शोभायात्रा काढण्यात आली .
अभंगवाणी व संताजींच्या जयजयकाराने संपूर्ण घोटी नगरी दुमदुमली होती. शहरात विविध संस्थांच्या वतीने संताजी महाराजाना अभिवादन करण्यात आले. या सोहळ्यासाठी स्थानिक संस्थानचे पदाधिकारी व संघटनांचे पदाधिका-यांनी सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. घोटी शहरातील संताजी नगर येथून संताजी महाराज सवाद्य मिरवणूक व शोभायात्रेला सुरु वात झाली. संताजींचा जयजयकार हरिनामाचा करत शोभायात्रा उत्साहात पुढे जात होती . शहरात ग्रामपलिका,ब् ाँका, पतसंस्था,आदी विविध संस्था व मान्यवरांनी ठिकठिकानी संताजींच्या तैलचित्रास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात केले. जगतगुरु तुकाराम महाराज व श्री संताजी महाराज यांच्या अभंगांचे गीताच्या चालिवर अनेक भिक्तरसात चिंब झालेले संताजी सेवक व महिला नाचत बागडत फुगडी खेळत वाटचाल करीत होते. या रथयात्रेमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. संताजी नगर येथे संताजींच्या जीवनावर ह भ प पांडुरंग महाराज साकुरे यांचे प्रवचन होऊन महाआरती करण्यात आली. तसेच हजारो उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्र मास समारोपप्रसंगी स्थानिक पदाधिका-री सहभागी झाले होते. संताजिनि दिलेल्या संदेशावर वाटचाल करु ण तेली समाजबांधवानी विकासाच्या प्रवाहात आपला ठसा उमटवा असे आवाहन यावेळी केले. व संताजी महाराजाना अभिवादन करु ण दर्शन घेतले. यांच्या सह तेली समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते . ह भ प प्रकाश केदार,प्रकाश कदम, बाळासाहेब शिरसाठ, पांडुरंग महाराज साकुरे लक्ष्मण क्षिरसागर, यांच्या नेतृत्वाखाली भजनी मंडळाने अभंग गात शोभायात्रेत भाविकांना मंत्रमुग्ध केले .या शोभायात्रेनंतर संताजींची प्रवचन व आरती झाली. यावेळी हजारो उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या पुण्यतिथि महोत्सवाच्या पाशर््वभूमीवर राज्यातील ख्यातनाम ह. भ. प.युवा कीर्तनकार विशाल महाराज फापळे यांचे संताजींच्या जीवनावर हरिकीर्तन झाले .