अंदरसुल ग्रामपंचायत कार्यालयात संतशिरोमणी संताजी महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 05:18 PM2019-12-08T17:18:46+5:302019-12-08T17:21:30+5:30

अंदरसूल : ग्रामपंचायत कार्यालयात संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी अंदरसुल ग्रामपालिकेच्या सरपंच प्रा. विनीता सोनवणे होत्या.

Santashiromani Santaji Maharaj Jayanti at InnerSul Gram Panchayat Office | अंदरसुल ग्रामपंचायत कार्यालयात संतशिरोमणी संताजी महाराज जयंती

अंदरसुल ग्रामपंचायत कार्यालयात संतशिरोमणी संताजी महाराज जयंती

googlenewsNext
ठळक मुद्देसंत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अंदरसूल : ग्रामपंचायत कार्यालयात संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी अंदरसुल ग्रामपालिकेच्या सरपंच प्रा. विनीता सोनवणे होत्या.
कार्यक्र माची सुरु वात दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवारांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राजेंद्र सोनवणे यांनी संत शिरोमणी जगनाडे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. तसेच अंदरसुल कृषि उत्पन्न उपबाजार समिती सभापती मकरंद सोनवणे यांनी संत जगनाडे महाराज यांचे विचार तसेच महाराजांचे सामाजिक योगदान या बाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सरपंच सोनवणे यांनी संतांचे कार्य तसेच संतांची शिकवण व अभ्यास या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्र मासाठी अमोल सोनवणे, जनार्दन जानराव, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा बागुल, स्वाती शिनगारे, राजेंद्र सोनवणे, सचिन बागुल, गोरख शिनगारे, योगेश शिनगारे, ऋ षिकेश सोनवणे, राजेंद्र ढोले, चिंतामनी भालेराव, रंगनाथ सोनवणे, सचिन सोनवणे, शंभु जंगम, बाळासाहेब देशमुख, किरण बनकर आदि उपस्थित होते.
 

Web Title: Santashiromani Santaji Maharaj Jayanti at InnerSul Gram Panchayat Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.