साऊथ एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनीला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:35 PM2018-03-27T18:35:35+5:302018-03-27T18:35:35+5:30

चीन येथील स्पर्धेत ब्रांझ पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने अखेर भूतान येथील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली

saouth,asian,sanjivanene,win,gold,crosscountry | साऊथ एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनीला सुवर्ण

साऊथ एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनीला सुवर्ण

Next
ठळक मुद्देकामगिरी : वर्षातील चौथे आंतरराष्ट्रीय  पदक. नेपाळ आणि श्रीलंका या संघांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर

साऊथ एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनीला सुवर्ण
नाशिक : चीन येथील स्पर्धेत ब्रांझ पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने अखेर भूतान येथील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या पदकामुळे संजीवनीने आणखी एक इंटरनॅशनल पदक पटकाविले. नेपाळ आणि श्रीलंका या संघांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
कॉमनवेल्थसाठीची पात्रता मिळू न शकल्याने निराश न होता संजीवनीने आंतरराष्ट्रीय  स्पर्धांमध्ये पदकांची कमाई सुरूच ठेवली आहे. चीन येथील एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत ब्रांझ पदक मिळविलेल्या संजीवनीने साऊथ एशियनमध्ये सुवर्ण पदक पटकावत आगामी एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचा सूचक इशारा दिला आहे.
साऊथ एशियनमध्ये ८ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत संजीवनीला शारीरिक क्षमता आणि प्रबळ मनोबल दाखविण्याची संधी असल्याने तिने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. या कामगिरीमुळे संजीवनीला आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक मिळाले असून, या हंगामात तिने आतापर्यंत सहा विविध पदके मिळविली आहेत.
कॉमनवेल्थ स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न अवघ्या काही अंतरामुळे हुकल्याने नाशिककरांना हळहळ वाटली होती. तिनेदेखील अनपेक्षित पराभव असल्याचे सांगत आगामी स्पर्धांमध्ये जिद्दीने खेळण्याचे आश्वासन तिच्या चाहत्यांना दिले होते. त्यानुसार भूतान येथील स्पर्धेत तिने थेट सुवर्ण पदक जिंकत अ‍ॅथलेटिक्स आणि क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताचे नाव उंचावले आहे. तिच्या या कामगिरीमुळे प्रशिक्षक वीजेंद्रसिंग यांनी समाधान व्यक्त केले असून, कॉमनवेल्थचे स्वप्न भंगलेले असतानाही संजीवनीने ज्या जिद्दीने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौशल्य दाखविले आहे. धावण्याचे सातत्य आणि विक्रमी वेळ प्रस्थापित करण्यासाठी संजीवनीने नाशिकमध्ये कसून सराव केला असून, या सरावाचा तिला लाभ होत आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिचे नाशिक अ‍ॅथेलेटिक्स आणि महिंद्राच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: saouth,asian,sanjivanene,win,gold,crosscountry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.