सफाई कर्मचाºयांची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:54 AM2017-07-31T00:54:46+5:302017-07-31T00:54:52+5:30

सुमारे साडेतीन ते चार लाख लोकसंख्या असलेल्या सिडको विभागाच्या स्वच्छतेसाठी सुमारे चारशेहून अधिक कर्मचारी संख्या असणे गरजेचे असताना गेल्या अनेक वर्षांपासून ही जबाबदारी अवघ्या ११० सफाई कर्मचाºयांकडून करण्यात येत आहे. यामुळे कर्मचाºयांना कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

saphaai-karamacaaoyaancai-taaraevaracai-kasarata | सफाई कर्मचाºयांची तारेवरची कसरत

सफाई कर्मचाºयांची तारेवरची कसरत

Next

सिडको : सुमारे साडेतीन ते चार लाख लोकसंख्या असलेल्या सिडको विभागाच्या स्वच्छतेसाठी सुमारे चारशेहून अधिक कर्मचारी संख्या असणे गरजेचे असताना गेल्या अनेक वर्षांपासून ही जबाबदारी अवघ्या ११० सफाई कर्मचाºयांकडून करण्यात येत आहे. यामुळे कर्मचाºयांना कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सिडको प्रभागात सहा प्रभागांचा समावेश असून, एकूण २४ नगरसेवक आहेत . सिडको प्रभागात जुने सिडको, नवीन सिडको, अश्विननगर, खुटवडनगर, तिडकेनगर, अभियंतानगर, अंबड औद्योगिक वसाहत, पाथर्डी फाटा परिसरासह मोठा भाग येत असून, कामकाज करण्यासाठी सुमारे चारशेहून अधिक कर्मचारी असणे गरजेचे आहे. परंतु सध्या सिडकोवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाकडे केवळ ११० कर्मचारी आहेत. यातच कर्मचाºयांची साप्ताहिक सुटी, आजारपण यात काही कर्मचारी गैरहजर राहतात. यामुळे कमी कर्मचाºयांकडून संपूर्ण सिडकोची साफसफाई करणे जिकिरीचे होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी सिडकोसह परिसरात स्वाइन फ्लू या आजाराने डोके वर काढले होते, परंतु यानंतरही कर्मचारीसंख्या वाढविण्यात आलेली नाही, अपुºया कर्मचाºयांमुळे कामकाज करताना कर्मचाºयांप्रमाणेच अधिकाºयांचीदेखील तारांबळ उडते. त्यामुळे अनेकदा कर्मचारी हे दैनदिन कामकाज करताना आज एका भागाची तर उद्या दुसºया भागात जाऊन सफाई करताना दिसतात. यामुळे परिसरात व्यवस्थित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरते. तसेच यामुळे परिसरात डासांचे प्रमाणही वाढलेले असून, याबाबत मनपाने दखल घेत सिडको विभागात सफाई कर्मचाºयांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
मुकादमांची संख्या केवळ दोनच
सिडको विभागासाठी सफाई कर्मचारी संख्या कमी आहे, त्याप्रमाणे कर्मचाºयांकडून कामकाज करून घेणाºया मुकादमांची संख्यादेखील कमीच आहे. सिडको विभागासाठी सध्या फक्त दोनच मुकादम असून, त्यांची संख्यादेखील १२ ते १५ असणे गरजेचे आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सिडको विभागात कर्मचारी संख्या वाढविण्यात यावे याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधी आवाज उठवितात. काही दिवसांपूर्वीच प्रभाग २४ मध्ये कर्मचारी संख्या वाढवावी यासाठी शिवसेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी याआधी मनपा आयुक्तांनाही निवेदन दिले आहे. परंतु अद्यापही सिडकोकडे मनपा अधिकाºयांकडून लक्ष दिले जात नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे साहजिकच परिसरात ठिकठिकाणी घाण व कचरा साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Web Title: saphaai-karamacaaoyaancai-taaraevaracai-kasarata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.