सप्तपदीचा विधी अन‌् चोरट्याने साधला ‘मुहुर्त’; नववधुचे ११ लाखांचे दागिने गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 07:44 PM2020-12-09T19:44:17+5:302020-12-09T19:48:16+5:30

विवाह सभागृहात मंचावर पुरोहितांच्या शेजारी बसलेले होते. यावेळी त्यांच्याकडे नववधुचे दागिने आणि रोख रकमेची लेडीज हॅन्ड बॅग पाठीमागे ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने ही संधी साधत कोणाचेही लक्ष नसल्याचा फायदा घेत अलगदपणे हॅन्ड बॅग घेऊन विवाह हॉलमधून काढता पाय घेतला.

The saptapadi ritual was performed by the thief 'muhurta'; 11 lakh jewelery of bride disappears | सप्तपदीचा विधी अन‌् चोरट्याने साधला ‘मुहुर्त’; नववधुचे ११ लाखांचे दागिने गायब

सप्तपदीचा विधी अन‌् चोरट्याने साधला ‘मुहुर्त’; नववधुचे ११ लाखांचे दागिने गायब

Next
ठळक मुद्देएक लाखाच्या रोकडचा समावेश हॉटेल व्यवस्थापनाने तत्काळ पोलिसांना माहिती कळविलीसीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील राजीवनगर शिवारातील एका हॉटेलमध्ये विवाहसोहळा पार पडत असतान सप्तपदीच्या विधीदरम्यान, मंचावरुन नववधुचे दागिने आणि रोकड असलेली ह्यलेडीज हॅन्ड बॅगह्ण एका अज्ञात चोरट्याने हातोहात लांबविल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक लाखाच्या रोकडसह नववधुच्या सुमारे दहा लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (दि.८) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी सुरेश मदनलाल बजाज (५५,रा.शहापुर) यांच्या कन्येचा विवाह हॉटेलमध्ये पार पडत होता. मंचावर सप्तपदीचा विधी सुरु असताना बजाज हे त्यांच्या पत्नी सरोज यांच्यासमवेत विवाह सभागृहात मंचावर पुरोहितांच्या शेजारी बसलेले होते. यावेळी त्यांच्याकडे नववधुचे दागिने आणि रोख रकमेची लेडीज हॅन्ड बॅग पाठीमागे ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने ही संधी साधत कोणाचेही लक्ष नसल्याचा फायदा घेत अलगदपणे हॅन्ड बॅग घेऊन विवाह हॉलमधून काढता पाय घेतला.
दरम्यान, विवाहविधी सुरु असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास रामचंद्र नारायण बेलवले यांना एक मुलगा लेडीज बॅग घेऊन जात असल्याचे नजरेस पडला. त्यांनी सभागृहात मंचाजवळ येत बजाज आणि लोकांना विचारले की 'कोणी मुलगा बॅग घेऊन जाताना कोणी बघितला का' त्यावेळी बजाज यांनी पाठीमागे ठेवलेली लेडीज बॅग त्या ठिकाणी नव्हती त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. सर्वांनी त्वरित विवाह सभागृहातून बाहेर धाव घेत पाहणी केली असता चोरटा कोठेही आढळून आला नाही, यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने तत्काळ पोलिसांना माहिती कळविली.
 याप्रकरणी बजाज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: The saptapadi ritual was performed by the thief 'muhurta'; 11 lakh jewelery of bride disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.