सप्तश्रृंगगड उपसरपंचांना महिलांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 01:23 AM2022-03-12T01:23:27+5:302022-03-12T01:23:57+5:30
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील नागरिकांना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दररोज तीस रुपयांप्रमाणे पाण्याचा जार विकत घ्यावा लागत आहे. प्रत्येक महिन्याला ९०० रुपये, वर्षाकाठी दहा हजार आठशे रुपये एका कुटुंबासाठी पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करावा लागत आहे. गडावरील लोकसंख्या चार ते साडेचार हजार असून, दररोज पाणी विकत घेणे परवडत नसल्याने संतप्त महिलांनी गुरुवारी उपसरपंच जयश्री गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके यांना घेराव घालत पाणीप्रश्नी जाब विचारला.
सप्तश्रृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील नागरिकांना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दररोज तीस रुपयांप्रमाणे पाण्याचा जार विकत घ्यावा लागत आहे. प्रत्येक महिन्याला ९०० रुपये, वर्षाकाठी दहा हजार आठशे रुपये एका कुटुंबासाठी पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करावा लागत आहे. गडावरील लोकसंख्या चार ते साडेचार हजार असून, दररोज पाणी विकत घेणे परवडत नसल्याने संतप्त महिलांनी गुरुवारी उपसरपंच जयश्री गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके यांना घेराव घालत पाणीप्रश्नी जाब विचारला.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाणी येत नाही, पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा आम्ही ग्रामपंचायतीला टाळे ठोकू, अशा संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करीत पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून महिला वर्गाला दोन किलोमीटर दररोज पायपीट करावी लागत आहे. शिवालय तलाव गुरुदेव आश्रम मंमादेवी चौक या ठिकाणाहून एक ते दोन किलोमीटर अंतरावरून उन्हाळा व पावसाळा याचा विचार न करता हातपंपांवरून महिला वर्ग डोक्यावरून हांडे घेऊन भर उन्हाचा तडाखा सहन करीत पाणी वाहून घेऊन जावे लागते, अशी दयनीय अवस्था महिला वर्गाची झाली आहे. आमच्याकडे दररोज दोनशे ते अडीचशे महिला पाणी भरण्यासाठी येतात; परंतु आम्ही त्यांच्याकडून पाण्यासाठी कुठलेही शुल्क आकारत नाही, अशी माहिती भूषण गवळी यांनी दिली.
----------------------
गडावर पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. हंडाभर पाण्यासाठी गडवासीयांना तीस रुपये मोजावे लागत आहेत. तीन दिवसांनंतर पाणी देण्यात येते. ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार व दुर्लक्षामुळे पाण्यासाठी महिलांना वणवण करीत फिरावे लागत आहे.
- नवनाथ बेनके, सप्तशृंगगड