भक्तांच्या गर्दीने सप्तशृंगगड दणाणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:48 AM2021-02-05T05:48:22+5:302021-02-05T05:48:22+5:30

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सलग सुट्टीचा लाभ घेत सुमारे दोन ...

Saptashranggad was crowded with devotees | भक्तांच्या गर्दीने सप्तशृंगगड दणाणला

भक्तांच्या गर्दीने सप्तशृंगगड दणाणला

Next

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सलग सुट्टीचा लाभ घेत सुमारे दोन ते तीन लाख भाविकांनी देवी दर्शनासाठी गर्दी केली होती. अचानकपणे दुपारनंतर भाविकांचा ओघ वाढायला सुरुवात झाली. गर्दी झाल्याने मंदिर गाभाऱ्यापासून ते भवानी चौकापर्यंत बाऱ्या लावण्यात आल्या होत्या. गर्दी झाल्याने ट्रस्ट कर्मचाऱ्याची धावपळ उडाली. येथील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. गर्दी वाढल्याने गडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मुंबई,पुणे, गुजरात, इंदूर, नाशिक, जळगाव, धुळे, मध्य प्रदेश या ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी आले होते. पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. वाहने पार्क करायला जागा नसल्यामुळे शेतात व जिथे जागा मिळेल तेथे आपले वाहने लावत होते. रोपवे गेटच्या समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

पाच किलोमीटर दूर वाहने पार्क करून भाविक पायी देवी दर्शनासाठी येत होते. रोपवे ट्राॅलीलाही गर्दी वाढल्याने तेथेही चार ते पाच तास वेटिंग असल्याने भाविकांनी पायऱ्या चढून देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे एकच गर्दी झाली होती. दुपारी एक वाजेपासून गर्दीचा ओघ वाढतच गेला. त्यामुळे काही भाविकांनी गर्दीचा अंदाज पहिल्या पायरीचे दर्शन घेत माघारी फिरले.

------------------------

जोर से बोलो जय माता दी, बोला अंबा माता की जय, सप्तशृंगी माता की जय अशा घोषणा देत संपूर्ण गड दुमदुमून गेला होता. घाटामध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाली. त्यामुळे घाटात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

----------------

सप्तशृंगगडावर दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी.

(२७ गड १/२)

===Photopath===

270121\27nsk_6_27012021_13.jpg

===Caption===

२७ गड १

Web Title: Saptashranggad was crowded with devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.