सप्तशृंगगड घेणार मोकळा श्वास
By admin | Published: March 19, 2017 11:33 PM2017-03-19T23:33:00+5:302017-03-19T23:33:21+5:30
वणी : तहसीलदारांचा आक्र मक पवित्रा
कळवण : सप्तशृंग गडावरील दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अतिक्र मणामुळे सप्तशृंग गडावर यात्राकाळात होणाऱ्या भक्तांच्या गर्दीमुळे होणारी कोंडी व विविध कारणास्तव वादग्रस्त ठरलेले अतिक्र मण जमीनदोस्त केल्याने सप्तशृंग गडाने मोकळा श्वास घेतला असून, तहसीलदार कैलास चावडे यांच्या आक्र मक पवित्र्यामुळे अतिक्र मणधारक हतबल झाले.
सप्तशृंग गडावरील अतिक्र मण काढण्याबाबत महसूल प्रशासनाने कठोर भूमिकेचा अवलंब केल्यावर आज ६२ अतिक्र मणे जमीनदोस्त करण्यात महसूल व पोलीस प्रशासनाला यश आले. ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा महसूल व पोलीस प्रशासनाची असल्याने सप्तशृंग गडावर आजअखेर ६२ अतिक्र मणे काढून टाकण्यात आली असून, उर्वरित अतिक्र मणांबाबत वनहक्क दावे प्रलंबित असून चार प्रकरणे न्यायालयीन प्रक्रि येत असल्याने या अतिक्र मणांबाबत यंत्रणेकडून नंतर निर्णय घेण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. कळवण पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, शिवाय अभोणा, पेठ, दिंडोरी, वणी येथील फौजफाटा तैनात करण्यात आला होता.(वार्ताहर)