सप्तशृंगी देवी : ट्रस्टतर्फे भाविकांना कॅरिबॅगचा वापर टाळण्याचे आवाहन गडावर प्लॅस्टीकमुक्तीचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:11 AM2018-02-04T00:11:17+5:302018-02-04T00:24:15+5:30
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आजपासून ‘प्लॅस्टिकमुक्त, स्वच्छ व सुंदर सप्तशृंगगड’चा श्री गणेशा करण्यात आला.
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आजपासून ‘प्लॅस्टिकमुक्त, स्वच्छ व सुंदर सप्तशृंगगड’चा श्री गणेशा करण्यात आला. यापूर्वीच गड ९० ते ९५ टक्के प्लॅस्टिकमुक्त झाला आहे. परंतु अजून कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी ग्रामपंचायत व संस्थानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविणार असून, त्याचा आज श्रीगणेशा करण्यात आला. या मोहिमेसाठी येणारा खर्च ग्रामपंचायत व देवी संस्थान मिळून करणार असून, नाशिक येथील अस्तित्व कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले असून, स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ४० पुरुष व महिला कर्मचाºयांची स्वच्छतेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. पहाटे ५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत दिवसभर संपूर्ण गावात साफसफाई करण्यात येणार आहे. तसेच
येथे असलेल्या सर्व ग्रामपंचायत व ट्रस्ट पदाधिकाºयांना ‘स्वच्छता बंधन धागा’ बांधण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश बर्डे, गिरीश गवळी, जगन बर्डे, बाळासाहेब व्हरगळ, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, ट्रस्टचे कर्मचारी शिंदे बापू, पगार, जाधव, दिलीप पवार, शांताराम गवळी, ग्रामसेवक रतिलाल जाधव, व्यापारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक महिन्यापूर्वी सप्तशृंगगडावरील प्लॅस्टिक पिशव्या व स्वच्छतेबाबत जिल्हा अधिकाºयांनी नाराजी व्यक्त करून गड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार, असा प्रश्न जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी ट्रस्ट व ग्रामपंचायतीला विचारला होता. याचीच कडक अंमलबजावणी करत प्लॅस्टिकमुक्त सप्तशृंगगड करणार असून, याबाबत ट्रस्टने व ग्रामपंचायतीने त्वरित पाऊल उचलून स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. पहिल्या पायरीजवळ ग्रामपंचायतीचे उपसंरपच राजेश गवळी व ट्रस्टचे व्यवस्थापक सूदर्शन दहातोंडे व अस्तित्व ग्रुपचे सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीत नारळ फोडून साफसफाईचा श्री गणेशा करण्यात आला. ‘अभियान प्रदूषण मुक्ततीचे, सप्तशृंगगडाचे पावित्र्य सांभाळा, प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर टाळा’ असा संदेश यावेळी देण्यात आला.