पंचमरंगात बहरले सप्तसूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:58+5:302021-06-28T04:11:58+5:30
नाशिक : पंचमदा अर्थात आर. डी. बर्मन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या संगीताने सजलेल्या गाण्यांचे सादरीकरण करीत नाशिकच्या कलावंतांनी ...
नाशिक : पंचमदा अर्थात आर. डी. बर्मन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या संगीताने सजलेल्या गाण्यांचे सादरीकरण करीत नाशिकच्या कलावंतांनी त्यांना स्वरांजली अर्पण केली.
पंचमदांनी आपल्या संगीताने सर्वांवर जी जादू केली, त्यातील काही निवडक हिंदी सुमधुर गाण्यांचे सादरीकरण आज करण्यात आले. नाम गुम जायेगा, मुसाफिर हूँ यारों, रिमझिम गिरे सावन, क्या जानू सजन यासारखी अनेक गाणी या कार्यक्रमात सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे संगीत व वाद्यवृंद संयोजन अमोल पाळेकर आणि संजय पुणतांबेकर यांनी केले. या गाण्यांना स्वरसाथ रागिणी कामतीकर, प्रांजली नेवासकर, आनंद अत्रे व मिलिंद धटिंगण यांनी दिली. वाद्यसाथसंगत निखिल खैराते, संजय पुणतांबेकर, नीलेश सोनवणे, महेश कुलकर्णी, नरेंद्र पुली, अभिजित शर्मा, चैतन्य पाळेकर, शुभम जाधव, देवाशिष पाटील व अमोल पाळेकर यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण मटकरी व नुपूर सावजी यांनी केले.
हा कार्यक्रम जनस्थानचे दिवंगत सदस्य नवीन तांबट, गीता माळी, अरविंद म्हसाणे यांना समर्पित करण्यात आला.
फोटो
२७कामतीकर