नाशकात सराफ बाजार ३१ मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 02:05 PM2020-03-23T14:05:16+5:302020-03-23T14:11:53+5:30

नाशिक सराफ संघटनेने शुक्रवारपासून (दि.२०) सलग तीन दिवस शहर, उपनगरातील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आहे. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणावर या वर्षी कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे

Saraf Market closed in Nashik till March 31 | नाशकात सराफ बाजार ३१ मार्चपर्यंत बंद

नाशकात सराफ बाजार ३१ मार्चपर्यंत बंद

Next
ठळक मुद्देसराफ बाजार सलद तीन दिवसांपासून बंदसर्व सराफी पेढ्यांचा 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनसुरक्षा गस्त वाढविण्याची सराफांकडून मागणी

नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक सराफ संघटनेने शुक्रवारपासून (दि.२०) सलग तीन दिवस शहर, उपनगरातील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आहे, परंतु, याकाळात पोलीस प्रशासनाने सराफ बाजारातील गस्त वाढवून व्यावसियांच्या सराफी पेढ्यांना सुरक्षा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणावर या वर्षी कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर अनेक नागरिक सोने खरेदीला प्राधान्य देतात. तर अनेकजण चांदीच्या गुढी, तसेच पूजेते ताट वाटी असे साहित्य खरेदी करतात. परंतु, यावर्र्षी पाडव्याच्या पाच दिवस पूर्वी पासूनच सराफांची सर्व दुकाने बंद असल्याने सराफ बाजारा शुकशुकाट दिसून येत असून  चार दिवसांत सराफ बाजारात जवळपास दोनशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. परंतु, राष्ट्रीय कतव्य म्हणून नाशिक, सिडको, पंचवटी सराफ संघटनांचे १ हजार ४८० सभासद या निर्णयात सहभागी होणार आहेत. सराफ बाजारात सराफी व्यावसायिक अ वर्गात येतात तर कारागीर, जंगम हे घटक ब वर्गात येतात. शहरात एकूण पाच हजार कारागीर असून यात सुमारे दोन हजार पश्चिम बंगालच्या कारागीरांचा समावेश आहेत. या सर्व कारागीरांना बंदच्या काळात एक हजार रुपयांपर्यंतचा किराणा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सराफ व्यावसायिकांनी घेतला आहे.

शहरात गस्ती वाढविण्याची गरज
प्रशासनाच्या सूचनेमुळे २० व २१ तारखेला शहर, परिसरातील सर्व सराफी पेढ्यांनी व्यवहार बंद ठेवल्यानंतर रविवारी जनता कर्फ्यूचेही कडेकोट पालन केले. यापुढेही सररारच्या सूचना मिळेपर्यंत व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सराफी पेढ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने शहरात गस्ती वाढविण्याची गरज आहे. 
 - चेतन राजापूरकर, नाशिक सराफ संघटना 

Web Title: Saraf Market closed in Nashik till March 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.