सराईत घरफोड्यांना पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:55 PM2019-01-08T12:55:14+5:302019-01-08T12:55:27+5:30

ओझर: येथील पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना पाठलाग करून पकडण्यात यश मिळविले.

Saraiate caught the chicks and chased them | सराईत घरफोड्यांना पाठलाग करून पकडले

सराईत घरफोड्यांना पाठलाग करून पकडले

Next

ओझर: येथील पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना पाठलाग करून पकडण्यात यश मिळविले. मध्यरात्रीच्या थराराने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण होते.
सोमवारी रात्रीच्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे अधिकारी कर्मचारी खाजगी वाहनातुन गस्त करीत असतांना टिळकनगर भागात रात्री १.३० वाजेच्या सुमारास एका बंगल्यात दोन ईसम संशयितरीत्या आत जातांना दिसले. गुन्हे शोधपथकाला बाहेर थांबून थोडी वाट पाहिली व नंतर त्यांच्याविषयी संशय बळावल्याने त्यांनी बंगल्यात आत प्रवेश करु न पाहिले असता दरवाजाचे कुलुप तोडलेले आढळले. म्हणून सदरचे संशयित ईसम हे चोरटे असल्याचे खात्री झाल्याने गुन्हे शोधपथकाने जीव धोक्यात घालून दरवाजास आत कडी लावलेली असल्याने गुन्हेशोध पथकाचे अनुपम जाधव, भास्कर पवार यांनी दरवाजा तोडुन आत प्रवेश केला. संशयित इसम गणेश बाजीराव केदारे हा लोखंडी पहार घेऊन कपाट तोडत होता. त्याने पोलीस पथकाला बघताच पहार टाकून बंगल्यामधील जिन्याच्या साह्याने बंगल्याच्या टेरिसवर गेला. त्यापाठोपाठ अनुपम जाधव व भास्कर पवार यांनी त्याचा पाठलाग केला. गणेश केदारे याने पळून जाण्यासाठी सरळ टेरेस वरून खाली उडी मारली. त्यापाठोपाट जाधव व पवार यांनी टेरेसवरून खाली उडी घेतली व केदारेला पकडल. दुसरा इसम गणेश शकर पुजारी हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. सदर प्रकारावरु न किशोर बाबुराव कोतकर यांचे फिर्यादीवरु न ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे करत आहे.
---------------------------------
संशयितांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे
संशयित गणेश केदारे याला ताब्यात घेऊन त्याला पोलीस खाक्या दाखवला असता तो व त्याचा साथीदार सदरच्या घरात चोरी करण्यासाठी आले सांगितले. गणेश बाजीराव केदारे (२७, राहणार सध्या वैदू वाडी म्हसरूळ) व गणेश शंकर पुजारी (राहणार शनी मंदिर झोपडपट्टी पेठरोड) अशी संशयितांची नावे असून त्यांनी नाशिक शहरात घरफोडया केल्याचे सांगितले. दोघांवर नाशिक शहर पंचवटी पोस्टेशनमध्ये पांच घरफोडीचे गुन्हे तसेच आडगाव पोस्टेशनला सहा गुन्हे तसेच सरकार वाडा व गंगापूर पोलीस स्टे हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: Saraiate caught the chicks and chased them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक