सापळा यशस्वी : सराईत गुन्हेगार सोनू कट्टा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 07:13 PM2020-06-09T19:13:44+5:302020-06-09T19:13:52+5:30

नाशिक : विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात इंदिरानगर पोलिसांना मागील 3 वर्षांपासून हवा असलेला यादीवरील सराईत गुन्हेगार समीर निजामुद्दीन शेख ...

Sarait criminal Sonu Katta in police custody | सापळा यशस्वी : सराईत गुन्हेगार सोनू कट्टा पोलिसांच्या जाळ्यात

सापळा यशस्वी : सराईत गुन्हेगार सोनू कट्टा पोलिसांच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देतडीपार शौकतलाही बेड्या ठोकल्या

नाशिक : विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात इंदिरानगर पोलिसांना मागील 3 वर्षांपासून हवा असलेला यादीवरील सराईत गुन्हेगार समीर निजामुद्दीन शेख उर्फ सोनू कट्टा यास अखेर पोलिसांनी वडाळा चौफुलीवर सापळा रचुन अटक केली. पोलिसांना चकमा देत फरार होण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या मागावर असलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील विविध गुन्हात गेल्या तीन वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार समीर निजामुद्दीन शेख उर्फ सोनू कट्टा (२९ मल्हार कॉलनी, वडाळा) हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांना गोपनीय खात्रीशीर बातमी मिळाली की सोनू कट्टा रविवार (दि.७) रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास वडाळागावात येणार आहे. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे यांना माहिती कळविली. तातडीने बोंडे हे जाकीर शेख, मुशरीफ शेख, राजेश निकम, अमोल सोनार, भाऊराव गवळी यांच्यासह रवाना झाले पथकाने वडाळा चौफुलीवर सापळा रचला. चार वाजेच्या सुमारास सोनू हा चौफुली वर आला असता त्याने पोलिसांना पाहून धूम ठोकली. परंतु सतर्क असलेल्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. तसेच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शौकत सुपडू शहा यास एक वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले असताना तो वडाळा गावात आल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने सापळा लावून शौकत उर्फ शौक्यालाही अटक केली. याबाबत पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.या दोघा गुंडांविरुद्ध घरफोडी, मारहाणसह जबरी गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.

 

Web Title: Sarait criminal Sonu Katta in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.