‘सर्जाराजा’ची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:06 AM2018-09-10T00:06:42+5:302018-09-10T00:19:01+5:30

‘वाडा शिवार सारं वाड-वडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई’ तझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेने, होऊ कसा उतराई’ या काव्यपंक्तींच्या भावार्थाला अनुसरून शहर व परिसरातील शेतकरी बांधवांनी रविवारी (दि.९) बैलपोळा उत्साहात साजरा केला.

Sarajaraja's procession | ‘सर्जाराजा’ची मिरवणूक

‘सर्जाराजा’ची मिरवणूक

Next
ठळक मुद्देपूजन : शहर परिसरात बैलपोळा उत्साहात

नाशिक : ‘वाडा शिवार सारं वाड-वडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई’ तझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेने, होऊ कसा उतराई’ या काव्यपंक्तींच्या भावार्थाला अनुसरून शहर व परिसरातील शेतकरी बांधवांनी रविवारी (दि.९) बैलपोळा उत्साहात साजरा केला.
शेतकºयांच्या कुटुंबाचाच भाग असलेल्या बैलांच्या अंगावर चढवलेल्या झुलींसह शिंगांना विविध रंगी बेगडांच्या पट्ट्या, मखमली गोंडे आणि गळ्यात घुंगरमाळांचा साजशृंगार करून गावागावांतून बैलांची मिरणूक काढून पूजा करण्यात आली.शहर परिसरातील विविध ठिकाणी पोळ्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणाºया सर्जाराजाला (बैलांना) सजवून ठिकठिकाणी रविवारी (दि.९) गावाच्या वेशीतून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. शहरपरिसरातील आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, दरी, मातोरी, आनंदवल्ली, पाथर्डी गाव, शिंदे पळसेसह विविध भागांत पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढून गावातील मारु ती मंदिराजवळ सर्व शेतकºयांनी बैलांना सजवून आणले होते. मारुती मंदिरात स्त्रीफळ वाढवून सर्जा-राजाची शेतकरी


कुटुंबातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून मनोभावे पूजन व औक्षण केले. दरम्यान, वर्षभर शेतील घाम गाळूनही शेतकºयाला शेती मालाचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे पिंपळगाव खांबसह शहरपरिसरातील काही गावांमध्ये शेतकºयांनी बैलांच्या अंगावर ‘भाजपा सरकार, शेतकरी बेजार’ शेतीवरील अन्यायकारक कर रद्द करा असे फलक लावून सरकारचा निषेध केला.
पुरणपोळीचा नैवेद्य
यंदा आॅगस्टमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाच्या पुनरागमनाने शेतकºयांमध्ये यंदा उत्साह दिसून आला. बळीराजासोबत शेतात रात्रंदिवस राबणाºया सर्जा-राजाला साजशृंगार करून पुरणपोळीचा नैवेद्य दिला.

Web Title: Sarajaraja's procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.