रक्षकाच्या सुरक्षेसाठी सरसावले युवा फाउंडेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:31+5:302021-06-16T04:18:31+5:30
: कोविड काळ मंदावला असला तरी संपलेला नाही, गेल्या १ वर्षाहून अधिक काळ प्रशासनातील विविध ...
: कोविड काळ मंदावला असला तरी संपलेला नाही, गेल्या १ वर्षाहून अधिक काळ प्रशासनातील विविध घटकांनी आपल्या स्तरावर प्रयत्नशील राहून आपल्या परीने सेवा दिली, त्यांचा कोरोनायोध्दा म्हणून समाजाने गौरवही केला. त्यांच्या वास्तूचे व वाहनांचे युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सॅनिटायझेशन करून समाजात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. रक्षकाचीही सुरक्षा महत्त्वाची मानली जाऊन त्या पार्श्वभूमीवर राबविलेला हा उपक्रम चर्चेचा विषय बनला आहे.
प्रशासन सुरक्षित तर समाज सुरक्षित असा विचार करून युवा फाउंडेशनने पोलीस स्टेशन, रुग्णवाहिका, शासकीय कार्यालये, स्मशानभूमी आदी ठिकाणी जाऊन सॅनिटायझेशन केले. त्यांचे हे कार्य सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. कोरोनाच्या कठीण काळात काम करताना अनेकांना वाईट प्रसंग अनुभवायला मिळाले; पण तो सेवेचा एक भाग होता, असे प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी मानले. अनेक जण त्यात कोरोनाबाधित झाले. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कामावर रुजू होऊन कर्तव्य बजावले. समाजसुध्दा त्यांचे देणे लागतो या भावनेतून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युवा फाउंडेशनने सॅनिटायझेशनचे काम हाती घेतले. आपल्या रक्षकाचीसुध्दा सुरक्षा बघायला हवी असा विचार युवा वर्गाने केला. त्यानुसार सुमित सोनवणे, प्रसाद वडनेरे, सुमित गायकवाड, नीलेश्वर पाटील, निखिल रांगोळे आदींनी सॅनिटायझेशनची मोहीम राबवली.
फोटो- १४ नांदगाव सॅनिटायझ
नांदगाव येथील शासकीय कार्यालयात सॅनिटायझेशन करतान युवा फाउंडेशनचे कार्यकर्ते.
===Photopath===
140621\14nsk_8_14062021_13.jpg
===Caption===
फोटो- १४ नांदगाव सॅनिटायझनांदगाव येथील शासकीय कार्यालयात सॅनिटायझेशन करतान युवा फाउण्डेशनचे कार्यकर्ते.