नाशिकचे सरस्वती पाटील विद्यालय देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 02:33 PM2020-01-03T14:33:07+5:302020-01-03T14:35:20+5:30

चेन्नई येथे आयोजित केलेल्या बाराव्या अविम नॅशनल आॅलिम्पक मध्ये सिडकोतील उंटवाडी येथील सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘जेट टॉय’ प्रकारात देशात अव्वल स्थान मिळवले

Saraswati Patil School of Nashik tops the country | नाशिकचे सरस्वती पाटील विद्यालय देशात अव्वल

नाशिकचे सरस्वती पाटील विद्यालय देशात अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्देपाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘जेट टॉय’ प्रकारात देशात अव्वल स्थान मिळवलेसर्वोत्तम संघ म्हणून कामिगरी करत दोन बक्षिसे मिळवली देशभरातून ४० विभागातून ८४ संघांनी सहभाग घेतला होता

नाशिक : द सोसायटी आॅफ आॅटोमोबाईल इंजिनिअरिंग व महिंद्रा उद्योग समूहाच्या वतीने चेन्नई येथे आयोजित केलेल्या बाराव्या अविम नॅशनल आॅलिम्पक मध्ये सिडकोतील उंटवाडी येथील सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘जेट टॉय’ प्रकारात देशात अव्वल स्थान मिळवले. तर न्यू इरा इंग्लिश स्कूल ने स्किमर या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले.
      स्पर्धेमध्ये पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांनी जास्त अंतर चालणे, जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता, ठरलेल्या ठिकाणी अचूक थांबणे, वळण घेणे, वेगाने चालणे, या प्रकारात सर्वोत्तम संघ म्हणून कामिगरी करत दोन बक्षिसे मिळवली. तसेच भविष्यात आॅटोमोबाईल उद्योगांमध्ये येणाऱ्या मंदीची कारणे व त्यावर उपयोजना यातूनही मुलांनी सादरीकरण करून प्रकल्प सादर केला. स्पर्धेसाठी देशभरातून ४० विभागातून ८४ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एकूण ३३२ विद्यार्थी ८४ शिक्षक व ८४ औद्योगिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. ‘जटे टॉय’ या स्पर्धेत सरस्वती गुलाबराव पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्र मांक पटकावला या प्रत्येक विद्यार्थ्याला रोख रक्कमेची शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना प्रणव वाडेकर, कैलास गांगुर्डे, मनिष चौधरी, ऋ षिकेश शिंदे, शिक्षक किरण शिरसाट, औद्योगिक स्वयंसेवक नरेंद्र निकुंभ, सुनील जानोरकर, रूपाली फुले यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Saraswati Patil School of Nashik tops the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.