सारडा सर्कल-भद्रकाली रोड अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:11 AM2018-02-17T02:11:49+5:302018-02-17T02:12:05+5:30
महापालिकेने पूर्व विभागातील सह्याद्री हॉस्पिटल परिसरात रस्त्यात अडथळा ठरणाºया अनधिकृत टपºया हटविण्याची कारवाई केली. तसेच सारडा सर्कल ते दामोदर थिएटरपर्यंतच्या रस्त्यावरील दुतर्फा अतिक्रमण हटविण्यात येऊन १३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय, पंचवटी विभागातही सामासिक अंतरात उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड काढण्यात आल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.
नाशिक : महापालिकेने पूर्व विभागातील सह्याद्री हॉस्पिटल परिसरात रस्त्यात अडथळा ठरणाºया अनधिकृत टपºया हटविण्याची कारवाई केली. तसेच सारडा सर्कल ते दामोदर थिएटरपर्यंतच्या रस्त्यावरील दुतर्फा अतिक्रमण हटविण्यात येऊन १३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय, पंचवटी विभागातही सामासिक अंतरात उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड काढण्यात आल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. अतिक्रमण विभागाच्या पथकाने सह्याद्री हॉस्पिटल येथे सार्वजनिक रस्त्यास अडथळा ठरणाºया अनधिकृत टपºया हटविल्या. तसेच सारडा सर्कल ते लोखंड बाजार त्यानंतर दूधबाजार ते दामोदर थिएटरपर्यंत रस्त्यावरील दोन्ही बाजंूकडील अतिक्र मणे हटविण्यात येऊन सुमारे १३ ट्रक विविध साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, नितीन नेर, बी. वाय. शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांमार्फत करण्यात आली. सहाही विभागांमध्ये अशाप्रकारे सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक आदी ठिकाणी अतिक्र मणे करून व्यवसाय करणारे भाजीविक्रे ते, फळविक्रे ते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांचेविरु द्ध अशाच प्रकारची कारवाई करून प्रसंगी पोलीस विभागात गुन्हेदेखील दाखल करण्यात येणार आहे.