मानोरीच्या उपसरपंचपदी सारिका शेळके बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:47 PM2019-12-26T17:47:46+5:302019-12-26T17:49:54+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सारिका नितीन शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सारिका नितीन शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत निवडणुकीत तीन सदस्य बिनविरोध निवडुन आल्यानंतर उपसरपंच पदाची धुरा कोण सांभाळणारा याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बुधवारी (दि.२५) दुपारी १२ वाजेपर्यंत उपसरपंच निवडणीसाठी केवळ सारिका नितीन शेळके यांचा एकमेव अर्ज विहित कालावधीत सादर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जे. पी. शिवनैये यांनी सारिका शेळके यांच्या उपसरपंचपदाच्या निवडीची घोषणा केली.
त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून गुलाल उधळण करण्यात आली. यावेळी जुना कार्यकाळ संपलेले सरपंच रेखा लिंगायत आणि उपसरपंच अप्पासाहेब शेळके यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. तसेच नविनर्वाचित सरपंच नंदाराम शेळके, उपसरपंच सारिका शेळके, सदस्य महेश शेळके आणि रेखा शेळके यांचा देखील सत्कार करण्यात आला.
दरम्यान या पंचवार्षिक निवडणुकीत नऊ सदस्य जागेपैकी केवळ तीन नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. हे तीनही उमेदवार सदस्यपदी बिनविरोध निवडून आले. दरम्यान सहा सदस्य पदे अद्यापही रिक्त असून पोटनिवडणुकीत ही सहा रिक्त पदे भरली जाणार असून त्याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहे.
यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे, पंढरीनाथ शेळके, दत्तात्रय शेळके, सुनील शेळके, साहेबराव शेळके, मधुकर भवर, नवनाथ शेळके, नितीन शेळके, सचिन शेळके, परशराम शेळके, किसन शेळके, राजू शेळके, रंगनाथ शेळके, वाल्मिक शेळके, सचिन चांदगुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.