सरीन यांनी स्वीकारला ओझर वायुसेना स्टेशनचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 01:23 AM2019-12-20T01:23:06+5:302019-12-20T01:23:24+5:30
ओझरच्या वायुसेना स्टेशनच्या प्रमुख पदाचा पदभार ग्रुप कॅप्टन व्ही. आर. एस. राजू यांच्याकडून स्वीकारला आहे. ओझरच्या वायुकमान अधिकारी पदाचा पदभार स्वीकारताना रस्मी परेडचे आयोजन करणयात आले होते.
नाशिक : ओझरच्या वायुसेना स्टेशनच्या प्रमुख पदाचा पदभार ग्रुप कॅप्टन व्ही. आर. एस. राजू यांच्याकडून स्वीकारला आहे. ओझरच्या वायुकमान अधिकारी पदाचा पदभार स्वीकारताना रस्मी परेडचे आयोजन करणयात आले होते. परेडनंतर एयर कमांडर पी. एस. सरीन यांनी वायुसेना स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. पुढील काळात ओझर वायुस्टेशनचे नाव उज्ज्वल करण्यासाठी व देखभाल दुरुस्तीचे मानक तसेच ठेवत उच्च गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
एयर कमांडर पी. एस. सरीन यांनी आयआयटी कानपूर येथून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक आणि पुणे येथून एमबीए पदवी प्राप्त केली आहे. ५ सप्टेंबर १९८८ रोजी त्यांनी भारतीय वायुसेनेच्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश केला. त्यांनी विविध प्रकारचा अभ्यास केला असून, त्याचा उपयोग परमाणू रणनीती, वरिष्ठ अधिकारी व एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी उपयोग होत आहे. त्यांना २६ जानेवारी २०१३ रोजी विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.