सारूळ दगड खाण दंड : सहा महिन्यांचा अल्टिमेटम वसुली फक्त सहा कोटींवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:21 AM2018-03-10T00:21:44+5:302018-03-10T00:21:44+5:30
नाशिक : नाशिक तालुक्यातील राजूर बहुला, सारूळ या गावांत वर्षानुवर्षे दगडांचे उत्खनन व त्यापासून खडी तयार करणाºया क्रशरचालकांकडून दंडासहित ६५० कोटी रुपये वसुलीची भीमगर्जना करणारे प्रशासन आता सहा कोटींवरच समाधान मानायला तयार झाले.
नाशिक : नाशिक तालुक्यातील राजूर बहुला, सारूळ या गावांत वर्षानुवर्षे दगडांचे उत्खनन व त्यापासून खडी तयार करणाºया क्रशरचालकांकडून दंडासहित ६५० कोटी रुपये वसुलीची भीमगर्जना करणारे जिल्हा प्रशासन आता सहा कोटींवरच समाधान मानायला तयार झाले असून, त्यासाठी १३ क्रशरचालकांना मार्चअखेर पैसे भरण्याचा तगादा लावला आहे. ज्या क्रशरची मुदत संपुष्टात आलेली नाही, त्यांना सहा महिन्यांत गाशा गुंडाळण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. नाशिकपासून जवळच व राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या राजूर बहुला, सारूळ या ठिकाणच्या क्रशरचालकांनी दगडाचे उत्खनन करून अख्खा डोंगरच गिळंकृत केला असून, जमिनीखालीदेखील वीस ते पंचवीस फूट त्यामुळे खदान तयार झाली आहे. भुसुरुंगाचा वापर करून दिवस-रात्र दगडांचा उपसा व त्यातून खडी तयार करण्याचे काम करणारे सुमारे दोन डझन क्रशर या ठिकाणी सुरू आहेत. अनेक कारणांनी गाजलेल्या राजूर बहुला व सारूळ येथील खदानीत काही बेकायदेशीर खडीक्रशर सुरू असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या सर्व क्रशरचालक व खाणींचे मोजमाप करून त्यांनी व्यवसाय सुरू केल्यापासून रॉयल्टी व त्यावरील दंडाची रक्कम भरून घेण्याचा निर्णय घेतला होता व ही रक्कम साडेसहाशे कोटींच्या घरात गेली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात गौणखनिजातून रॉयल्टी मिळणार असल्याच्या खुशीत जिल्हा प्रशासन असताना दुसरीकडे खाणीतून उपसा व खडीक्रशरही दोन वर्षांपासून निर्धोक सुरू आहेत. गेल्या महिन्यात गौणखनिज विभागाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाºयांच्या मदतीने या खाणींचे तांत्रिक पद्धतीने मोजमाप करून त्यातून करण्यात आलेला उपसा व प्रत्यक्षात खाणमालकांनी भरलेली रॉयल्टी याचा अंदाज बांधला असून, त्यातील १३ खाण व क्रशरमालकांकडून फक्त सहा कोटी रुपयांची वसुली बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे.