सर्पमित्राचा उतरवला दहा लाखांचा विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:32+5:302021-06-24T04:11:32+5:30
विकास सर्पमित्र म्हणून अत्यंत जोखमीचे काम करत असतो. अनेकवेळा साप पकडत असताना जीवितास धोका निर्माण होत असतो. या ...
विकास सर्पमित्र म्हणून अत्यंत जोखमीचे काम करत असतो. अनेकवेळा साप पकडत असताना जीवितास धोका निर्माण होत असतो. या सर्व प्रकारच्या गोष्टींचा सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बंधन फाउंडेशनच्या सदस्यांनी विचार करून त्याचा फाउंडेशनतर्फे तब्बल दहा लाख रुपयांचे अपघाती विमा कवच उतरवून संरक्षण देण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्ततादेखील करण्यात आली आहे. येथील ज्येष्ठ नागरिक तसेच उपसरपंच लक्ष्मण साबळे यांच्या हस्ते तसेच पदाधिकारी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदर विम्याचे प्रमाणपत्र सर्पमित्र विकास ननावरे यास सुपुर्द करण्यात आले. यापुढेही दरवर्षी सर्पमित्र विकास ननावरे यांचा सदर स्वरूपाचा विमा फाउंडेशनतर्फे उतरविणार असल्याची माहिती बंधन फाउंडेशनचे अध्यक्ष राजू सानप यांनी दिली आहे. यावेळी लक्ष्मण साबळे, माजी सरपंच हिरामण भाबड, माजी उपसरपंच शरद सानप, माजी ग्रामपंचायत सदस्य के.पी. सानप, तात्या पाटील सानप, रतन सांगळे, वसंत साबळे, मधुकर साबळे, रतन गोसावी, रणशेवरे, सुनील सानप, अशोक आभाळे, भाऊपाटील रहाणे, पंकज सानप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- २३ भोकणी स्नेक
===Photopath===
230621\23nsk_7_23062021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ भोकणी स्नेक