येवला तालुक्यात सरपंच, उपसरपंच निवडणूका शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:14 AM2021-02-14T04:14:12+5:302021-02-14T04:14:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क येवला : तालुक्यातील पहिल्या टप्प्यात ४० ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी उत्साहात झाल्या. ४० पैकी २७ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी ...

Sarpanch and Deputy Sarpanch elections in Yeola taluka are peaceful | येवला तालुक्यात सरपंच, उपसरपंच निवडणूका शांततेत

येवला तालुक्यात सरपंच, उपसरपंच निवडणूका शांततेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

येवला : तालुक्यातील पहिल्या टप्प्यात ४० ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी उत्साहात झाल्या. ४० पैकी २७ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिलांना संधी मिळाली आहे.

तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या होत्या. यापैकी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असतांना झालेल्या तक्रारीने सदर निवडणूक रद्द झाली आहे.६८ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात ४० ग्रामपंचायतींचा सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम शुक्रवारी, (दि. १२) घेण्यात आला. गणेशपूर ग्रामपंचायत सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले असतांना या ठिकाणी सदस्य जागा रिक्त आहे. त्यामुळे गणेशपूर येथील सरपंचपद सदस्याअभावी रिक्त राहिले आहे.

ग्रामपंचायत निहाय सरपंच व उपसरपंच असे, गुजरखेडे - सरपंच बापुसाहेब गंगाधर चव्हाण, उपसरपंच साहेबराव पोपट बच्छाव. नेऊरगांव - मोनाली रामेश्वर सोनवणे, दशरथ रामचंद्र कदम. आंबेगांव - अर्चना मनोज गिते, अलका घनश्याम काळे. तळवाडे - संतोष रामनाथ आरखडे, शेख इरफान सलिम. जळगांव नेऊर - विकास अशोक गायकवाड, सत्यभामा नाना शिंदे. कोटमगांव खुर्द - संध्या अर्जुन कोटमे, प्रविण कारभारी मोरे. उंदिरवाडी - प्रशांत उत्तमराव देशमुख, नारायण पुंडलीक राजूळे. सातारे - सुमनबाई सुर्यकांत शिंदे, ईश्वर आनंदा गांगुर्डे. साताळी - सुनंदा पुंजाराम काळे, गणेश वाळीराम कोकाटे. विसापुर - सुरेश भिमराव गोधडे, शोभा योगेश जांभळे. ठाणगांव - यमुना मारुती भवर, कृष्णा अरुण कव्हात. नांदुर - रामदास बळवंत शिंदे, सुनिता अशोक पगारे. एरंडगाव बु॥ - निर्मला मारुती आहेर, रशिद मन्नु पटेल. रहाडी - जया संजय रोकडे, रुक्सानाबानो सुलतान शेख. बाभुळगांव खुर्द - मिना सुभाष वाबळे, रविंद्र नामदेव बोरणारे. अंगणगांव - ज्योती नितीन गायकवाड, भानुदास वालनाथ गायकवाड. राजापुर - नलिनी कैलास मुंढे, सुभाष एकनाथ वाघ. डोंगरगाव - भिमाबाई तात्यासाहेब ढोकळे, गौतम बाबु पगारे. अनकुटे - सुनिता बापु गायकवाड, भिमाजी गंगाधर गायकवाड. मुखेड - पुष्पाताई वसंत वाघ, सागर भिमा वाघ. पन्हाळसाठे - अंजली सतीश गांगुर्डे, रंजना रामदास घुगे. अनकाई - नगिना बाबुलाल कासलीवाल, शिवम दिपक आहिरे. वाघाळे - मुरलीधर हरिश्चंद्र सोमासे, कोंडीराम संपत बडे. देशमाने बु॥ - प्रमोद भास्कर दुघड, यशवंत रामचंद्र जगताप. आहेरवाडी - सविता दत्तू देवरे, सविता रामनाथ कोल्हे. आडगांव रेपाळ - सुनिता तुकाराम गुंजाळ, बाबासाहेब रघुनाथ महाले. मुरमी - अरुणा बाळनाथ पानसरे, महेश नवनाथ शिंदे. बल्हेगांव - सुशिला साहेबराव कापसे, जालींदर किसन कांडेकर. रेंडाळे - कमलबाई एकनाथ मोरे, बानोबी अकिल मुलतानी. धामणगांव - चंद्रकला एकनाथ ठाकरे, ज्ञानेश्वर अशोक वाळूंज. गणेशपुर - सरपंच पद रिक्त, उपसरपंच सचिन रमेश जाधव. अंदरसुल - सविता शरद जगताप, झुंजार शिवाजीराव देशमुख. भाटगांव - मंगल संतोष गुंजाळ, वसंत उत्तमराव पवार. नगरसुल - मंदाकिनी सतिश पाटील, कांता राजेंद्र निकम. पिंपळखुटे बु॥ - शिवाजी दौलत पगारे, शिलाबाई अण्णासाहेब पवार. सावरगाव - ध्रुपदाबाई उत्तम पवार, मच्छिंद्र एकनाथ पवार. धामोडे - ताराबाई भाऊसाहेब भड, निवृत्ती हनुमंता भड. खरंवडी - जगन्नाथ भागुजी मोरे, चांगदेव गोपीनाथ आहेर. महालखेडा पाटोदा - पुंडलिक अहिलाजी होंडे, रमेश विठ्ठल माळी. देवळाणे - सोमनाथ ज्ञानेश्वर हरिशचंद्रे, गोरख पर्वत काळे.

Web Title: Sarpanch and Deputy Sarpanch elections in Yeola taluka are peaceful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.