नांदगावच्या भालुर गावचे सरपंच संदीप आहेर यांनी राखले ‘आरोग्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:47 IST2019-02-28T18:45:08+5:302019-02-28T18:47:46+5:30
नांदगाव तालुक्यातील भालुर या गावात त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष कें द्रीत करत कचरा निर्मूलन केले.

नांदगावच्या भालुर गावचे सरपंच संदीप आहेर यांनी राखले ‘आरोग्य’
नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत नांदगाव तालुक्यातील भालुर गावात सरपंच संदीप आहेर यांनी आरोग्याच्या सोयीसुविधांवर भर देत गावकऱ्यांचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांना ‘आरोग्य ’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील भालुर या गावात त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करत कचरा निर्मूलन केले. यासाठी गावात जागोजागी क चराकुंड्यांची व्यवस्था केली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गप्पी मासे पालन केले. डास प्रतिबंधात्मक औषध धूर फवारणी नित्यनेमाने गावात सुरू केली. वर्षातून एकदा तननाशक फवारणीचाही उपक्रम त्यांनी हाती घेतला. महिला, किशोरवयीन मुलींकरीता प्राथमिक उपकेंद्रांमध्ये सॅनेटरी नॅपकिनचे वेंडींग यंत्र बसविले. पाण्याच्या तपासणीसाठी ओटी टेस्ट यंत्रही त्यांनी गावात आणले. तसेच शुध्द जल गावकऱ्यांना नियमित उपलब्ध व्हावे, यासाठी टीसीएल पावडरचा वापर पिण्याच्या पाण्यात सुरू केला. गावातील सर्व उघड्या गटारी भुमिगत केल्या व गाव १०० टक्के हगणदारीमुक्त क रण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने जल व्यवस्थापन गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.