बागलाणच्या विकासासाठी होणार सरपंच परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:25+5:302021-09-12T04:17:25+5:30
सदर परिषदेच्या लोगोचे अनावरण बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते व प्रभाग सभापती ज्योती अहिरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, ...
सदर परिषदेच्या लोगोचे अनावरण बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते व प्रभाग सभापती ज्योती अहिरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सरपंच परिषदेत तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे दोन सत्रात आयोजन करण्यात येणार आहे. परिषदेसाठी प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, यशदाचे मानद व्याख्याते व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील, पाटोद्याचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील व ग्रामविकासातील वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यात पहिल्यांदा सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे सर्वच स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या कार्यशाळेतून ग्रामविकासाला निश्चितपणे चालना मिळेल, असा आशावाद आमदार बोरसे यांनी यावेळी व्यक्त केला.
परिषदेच्या नियोजनात संजय गोसावी,सुयोग अहिरे, आकाश भामरे, सरपंच धनंजय पवार, लखन पवार, वैशाली शेलार,चेतन वणीस, लखन सावंत, काशिनाथ हांडे, नीलेश गौतम, रोशन भामरे, सखू साबळे, दीपक खैरनार, पंकज सोनवणे, किरण सूर्यवंशी, काळू चौधरी आदींचा सहभाग आहे.