सरपंच, उपसरपंच कोरोना लस घेण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:28 PM2021-02-23T23:28:44+5:302021-02-24T00:38:42+5:30

गंगापूर: कोरोनाच्या संकटकाळात ग्रामपातळीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंचांनी कोरोनाला प्रतिबंध केला. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होणार नाही याची दक्षता घेण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या सदस्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Sarpanch, Deputy Sarpanch Corona ready to be vaccinated | सरपंच, उपसरपंच कोरोना लस घेण्यास तयार

सरपंच, उपसरपंच कोरोना लस घेण्यास तयार

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: कोरोना योद्धा म्हणून योगदान

गंगापूर: कोरोनाच्या संकटकाळात ग्रामपातळीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंचांनी कोरोनाला प्रतिबंध केला. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होणार नाही याची दक्षता घेण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या सदस्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, आरोग्यसेवक व ग्रामसेवकांबरोबरच सरपंच-उपसरपंच तसेच सदस्यांनी जीवाची पर्वा न करता कोरोनावर मात करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात ठेवला. आता कोरोना लस आल्यानंतर डॉक्टर्स, आरोग्यसेवक व ग्रामसेवक यांनाच प्राधान्याने लस देण्यात आली. सरपंच-उपसरपंच व सदस्यांचा कुठेही विचार करण्यात आलेला नाही. या महामारीत ग्रामीण भागात सर्वात जास्त मेहनत घेणाऱ्या सरपंच-उपसरपंच व सर्व सदस्यांनाही ही लस त्वरित द्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर, अनिल ढिकले, सदानंद नवले, अजिंक्य चुंबळे, सागर जाधव, ढगे आदी उपस्थित होते.
 
Web Title: Sarpanch, Deputy Sarpanch Corona ready to be vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.