बागलाणमध्ये ३८ गावांचे सरपंचपद राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 09:26 PM2021-01-28T21:26:27+5:302021-01-29T00:40:53+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील तब्बल ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी (दि २८) जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश सरपंचपद आरक्षित झाल्याने अनेकांचे मनसुभे उधळले तर अनेकांची लॉटरी लागली आहे.
सटाणा : बागलाण तालुक्यातील तब्बल ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी (दि २८) जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश सरपंचपद आरक्षित झाल्याने अनेकांचे मनसुभे उधळले तर अनेकांची लॉटरी लागली आहे.
येथील पंचायत समिती सभागृहात सकाळी ११ वाजता प्रभारी तहसीलदार शुभम गुप्ता यांनी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले. ८२ ग्रामपंचायत पैकी ४४ ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुले करण्यात आले आहेत. २२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद ओबीसीसाठी तर अनुसूचित जमातीसाठी १२ आणि अनुसूचित जातीसाठी चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे.
सरपंचपदाच्या सर्वसाधारण ग्रामपंचायतींमध्ये जुने निरपूर, सुराणे, फोपिर, ब्राम्हणपाडे, बिजोरसे, भाडाने, पारणेर, ब्राम्हणगाव, सारदे, सोमपूर ,उत्राणे, ठेंगोडा, जुनी शेमळी, रामतीर, निताने, बिजोटे, खमताने, पिंपळदर, दरहाणे,आखतवाडे, वाडीपिसोळ, औंदाणेपाडा, बोढरी, इजमणे, मोराणे सांडस, नळकस, मळगाव भामेर, श्रीपूरवडे, करंजाड, आराई, मोरेनगर, तांदुळवाडी, वाघळे, आनंदपूर, महड, टेंभे खालचे, तळवाडे भामेर, विरगाव, औदाणे ,चौंधाने, डोंगरेज, वटार, मुळाने, ताहाराबाद या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ओबोसी आरक्षित गावांमध्ये कर्हे, काकडगाव, खामलोण, नवेगाव, नवे निरपूर, लाडूद, कोडबेल, दोद्धेश्वर झ्रकोळीपाडा, नवी शेमळी, तरसाळी, मळगाव तिळवण, टेंभे वरचे, खिरमणी, आव्हाटी, ढोलबारे, रातीर, देवळाने, यशवंतनगर, गोराणे,आसखेडा, वनोली,चिराई या ग्रामपंचायती आहेत.
अनुसूचित जमाती आरक्षित ग्रामपंचायतींमध्ये आजमीर सौंदाणे ,पिंगळवाडे,अंबासन ,द्याने ,दरेगाव ,पिंपळकोठे ,लखमापूर ,जायखेडा ,चौगाव ,धांद्री ,कुपखेडा ,मुंजवाड या गावांचा समावेश आहे.
अनुसूचित जातीसाठी नामपूर ,नांदिन,भाक्षी ,वायगाव या गावांचे आरक्षण पडले आहे. येत्या ३ फेब्रुवारीला महिला आरक्षण काढण्यात येणार आहे.