सरपंच सेवा महासंघाच्या जिल्हाध्यक्षांची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:21+5:302021-07-14T04:17:21+5:30
जळगाव नेऊर : सरपंच सेवा महासंघा मार्फत विविध गावांच्या सरपंचांना शासनाच्या प्रत्येक योजनांचा,गावच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा व्हावा यासाठी प्रशिक्षण, ...
जळगाव नेऊर : सरपंच सेवा महासंघा मार्फत विविध गावांच्या सरपंचांना शासनाच्या प्रत्येक योजनांचा,गावच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा व्हावा यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आगामी काळात देण्यात येणार आहे.संघाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पात्र विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली असून राज्यभरात सरपंच सेवा महासंघाची रचनात्मक बांधणी करण्यात आली आहे. गावातील विविध प्रश्न, समस्या सुटाव्यात यासाठी सरपंच सेवा महासंघाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी दिली. आगामी काळात विविध मार्गदर्शन शिबिरे, व्याख्याने यासह सरपंच सेवा महासंघाचे अधिवेशन घेऊन ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तींचा सुसंवाद घडवून आणण्याचा आमचा मानस असल्याचे पुरुषोत्तम घोगरे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी राज्य मार्गदर्शक शशिकांत मंगळे, कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, सचिव सुनील राहाटे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, संघटक अण्णासाहेब जाधव, सल्लागार हनुमंत सुर्वे, महिला उपाध्यक्षा वंदना गुंजाळ, संघटिका ज्योती अवघड, राज्य प्रवक्ते दिनेश गाडगे, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, सतीश चर्हाटे, राज्य निरीक्षक राजकुमार मेश्राम, कोषाध्यक्ष सदाशिव ढेंगे, राज्य प्रसिद्धी प्रमुख मंगेश तायडे, राज्य सोशल मीडिया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर , सरपंच माझाचे संचालक रामनाथ बोराडे, राज्य कार्यकारिणी सदस्य सतीश साखरे, सागर कळसकर, सचिन नाडमवार, किशोर धामंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------
वाकचौरे, म्हस्के यांची वर्णी
मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये नाशिक विभागीय अध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे, नाशिक विभाग
बाळासाहेब मस्के (नाशिक), महेंद्र पाटील (धुळे), मनोज चौधरी (नंदुरबार), उमेश साळुंखे (जळगाव), श्रीनाथ थोरात, अनिल शेडाळे (अहमदनगर) आदींची नियुक्ती करण्यात आली.