उंबरखेडला सरपंच सेवा संघ पदाधिकाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:52+5:302021-09-15T04:17:52+5:30
याप्रसंगी शेतकऱ्यांना शेतमालाच्या दळणवळणाची मोठी गैरसोय होते; मात्र शासनाच्या आराखड्यात शिवार रस्त्यांची एकही योजना नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व पंचायत ...
याप्रसंगी शेतकऱ्यांना शेतमालाच्या दळणवळणाची मोठी गैरसोय होते; मात्र शासनाच्या आराखड्यात शिवार रस्त्यांची एकही योजना नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व पंचायत समिती हतबल आहे. शासनाचे लक्ष नाही, शासनाचे कर्मचारी काम करत नाही; मात्र ते करून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आता बळकट होत आहे. गावांच्या विकासासाठी आणि शासनाकडून भरगच्च निधी आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था एकजूट झाल्या असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या अमृता पवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव आथरे, माजी सभापती व शिवा राजे सुराशे, राजाभाऊ पाटील, सुलभा पवार, अमोल जाधव, देवेंद्र काजळे, सरपंच सेवा समितीचे विभागीय अध्यक्ष तथा ब्राह्मणगावचे सरपंच मंगेश गवळी, उंबरखेड गावच्या सरपंच सीमा निरगुडे, उपसरपंच मुकुंद (भाऊ) घुमरे, सरपंच सेवा संघ निफाडच्या सरचिटणीस ललिताबाई शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी संतोष जाधव, सचिन शिंदे, दत्तात्रय पळसे, सुनील आथरे, राजेंद्र निरगुडे, विलास डोखळे, राजेंद्र गांगुर्डे, विशाल आथरे, प्रशांत शिंदे, ज्ञानेश्वर पानसरे, दिलीप कोकाटे, विजय घुमरे, दीपक निरगुडे, नीलेश शिंदे, रघुनाथ घुमरे, जयवंत निरगुडे, दिनकर शेजवळ, साहेबराव आथरे, नामदेव डोखळे, सोमनाथ आथरे, गणपत पानसरे, अशोक शिंदे, सुभाष शिंदे, शंकर कागदे उपस्थित होते. सूत्रसंचालन तुषार घुमरे तर आभार प्रदर्शन शंकर शिंदे यांनी केले. (१४ पिंपळगाव ३)
140921\14nsk_6_14092021_13.jpg
१४ पिंपळगााव ३