एकलहऱ्यात ‘सरपंच आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:17 AM2018-11-15T00:17:34+5:302018-11-15T00:18:01+5:30
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येऊन नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार सुमारे ८० हजार रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली.
एकलहरे : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येऊन नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार सुमारे ८० हजार रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली. सरपंच मोहिनी जाधव यांनी गावात फिरून नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले. त्यावेळी ग्रामस्थांनी लाईट, पाणी, आरोग्य सेवा, रस्ते, स्वच्छताग्रहे, बालवाडी, अंगणवाडी आदींबाबत विविध प्रकारच्या अडीअडचणींचा पाढाच वाचला. त्यावर समस्या सोडविण्यासाठी ग्रामविस्तार अधिकारी व कर्मचाºयांना सूचना करण्यात आल्या. यावेळी एकलहरेगाव, गंगावाडी, सिद्धार्थनगर परिसरातील रहिवाशांना ग्रामपंचायतीचे विविध कर भरण्यासाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत रहिवाशांनी लगेचच घरपट्टी भरण्यास तत्परता दाखवित सुमारे ८० हजार रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली. एकलहरे सरपंचांच्या या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी जे. डी. सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, संसरीचे ग्रामविकास अधिकारी एस. एस. गायकवाड, हिंगणवेढेचे ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर भोर, उपसरपंच अशोक पवळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ होलीन, संजय वावरे, सचिन पवळे, नितीन राजोळे उपस्थित होते.