सरपंचाचे अपील फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:49 AM2018-12-04T00:49:26+5:302018-12-04T00:52:14+5:30

सिन्नर : अविश्वास ठरावाच्या विरोधात तालुक्यातील निमगाव-सिन्नरचे सरपंच बाळासाहेब रामनाथ सानप यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. त्यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव योग्य असल्याचा शेरा अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी दिल्याने सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Sarpanch's appeal was rejected | सरपंचाचे अपील फेटाळले

सरपंचाचे अपील फेटाळले

Next
ठळक मुद्दे निमगाव-सिन्नर : अविश्वास ठराव योग्य असल्याचा शेरा

सिन्नर : अविश्वास ठरावाच्या विरोधात तालुक्यातील निमगाव-सिन्नरचे सरपंच बाळासाहेब रामनाथ सानप यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. त्यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव योग्य असल्याचा शेरा अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी दिल्याने सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अविश्वास ठरावासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीची नोटीस आपल्यासह बाळू चंद्रमोरे या सदस्यास मिळाली नसल्याचा दावा सरपंच सानप यांनी केला होता. त्याचा आधार घेत त्यांनी अपर जिल्हाधिकाºयांकडे अपील करून अविश्वास ठराव मंजूर झालेल्या सभेस आव्हान दिले होते. त्यांच्या विरोधात आठ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव तहसीलदारांनी २४ आॅक्टोबर २०१८ राजी बहुमताने मंजूर केला होता. त्यावर सानप यांनी अपर जिल्हाधिकाºयांकडे अपील करत आपल्या विरोधात मंजूर झालेल्या ठरावाची प्रतिक्रियाच चुकीच्या पद्धतीने राबविल्याचा आरोप केला होता.
यावेळी उपस्थित आठ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केल्याने ८ विरुद्ध ० असा ठराव मंजूर झाला. त्यावर सरपंच सानप यांनी अपर जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल करत तहसीलदार, ग्रामसेवक यांच्यासह अन्य सदस्यांना प्रतिवादी केले होते. ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत सानप यांचे अपील फेटाळण्यात आले.
सदर निकालाची प्रत तहसीलदारांना पाठविण्यात आली असून, संबंधिताना हा आदेश बजावून तसा अहवाल विहित मुदतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. ग्रामसेवकासह गटविकास अधिकाºयांनाही माहितीसाठी या आदेशाची प्रत पाठविण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमार्फत विकासकामे करताना सरपंच सानप सदस्यांना विचारात घेत नसल्याचा आरोप करत सदस्य जयसिंग नागरे, शोभा सानप, सुनीता सांगळे, सचिन सानप, विमल सानप, कविता सानप, छाया सानप, संजय सानप या आठ सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास दाखल केला होता. यावेळी सरपंच बाळासाहेब सानप आणि बाळू चंद्रमोरे हे दोन सदस्य अनुपस्थित होते. मात्र सभागृहाच्या नियमाप्रमाणे २/३ पेक्षा जास्त सदस्य यावेळी उपस्थित असल्याने सभेचे कामकाज चालविण्यात आले.

Web Title: Sarpanch's appeal was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.