कोरोनाबाधित रुग्णांसाठी सरपंचांचे एसएमबीटीला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:15 AM2021-05-06T04:15:21+5:302021-05-06T04:15:21+5:30
इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, रुग्णांचा वाढता आकडा पाहता, तालुक्यात सर्व सुविधायुक्त असे एकमेव हाॅस्पिटल म्हणून ...
इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, रुग्णांचा वाढता आकडा पाहता, तालुक्यात सर्व सुविधायुक्त असे एकमेव हाॅस्पिटल म्हणून एसएमबीटी हॉस्पिटलकडे पाहिले जाते. ग्रामीण भागात असे एकही अन्य हाॅस्पिटल नसल्यामुळे शहरातील दवाखान्यात रुग्णांना उपचारासाठी जाण्यासाठी खूपच आटापिटा करावा लागता. तालुक्यातील खेड गटातील सर्व सरपंचांनी याबाबत तोडगा काढण्यासाठी एसएमबीटी प्रशासनाकडे धाव घेत, एक बैठक आयोजित करून सकारात्मक चर्चा केली. या चर्चेदरम्यान इगतपुरी तालुक्यातील स्थानिक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, तसेच इतर सर्व आरोग्य सुविधा प्राधान्याने देण्यात येईल, असे आश्वासन एसएमबीटीचे प्रमुख डाॅ.कुऱ्हे यांनी दिले असल्याचे सरपंच भगवान वाकचौरे यांनी सांगितले. बैठकीला सरपंच शिवाजी गाढवे, देविदास देवगिरे, गणेश टोचे, साहेबराव बांबळे, रतन बांबळे, दिलीप पोटकुले, अशोक बोराडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
कोट....
इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात सर्व सुविधायुक्त असे हाॅस्पिटल नसल्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड, तसेच इतर सुविधा तत्काळ न मिळाल्याने जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर सर्व सरपंच यांनी एसएमबीटी प्रशासनाची भेट घेत, सकारात्मक चर्चा केली असून, तालुक्यातील स्थानिक रुग्णांना प्राधान्याने आरोग्य सुविधा पुरविण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
- भगवान वाकचौरे, सरपंच, पिंपळगाव डुकरा
फोटो - ०५ एसएमबीटी हॉस्पिटल
धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसुविधा मिळण्यासाठी एसएमबीटी प्रशासनासोबत चर्चा करतांना सरपंच भगवान वाकचौरे. समवेत देविदास देवगिरे, साहेबराव बांबळे, शिवाजी गाढवे, गणेश टोचे आदींसह इतर पदाधिकारी.
===Photopath===
050521\05nsk_30_05052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसुविधा मिळण्यासाठी एसएमबीटी प्रशासनासोबत चर्चा करतांना सरपंच भगवान वाकचौरे. समवेत देविदास देवगिरे, साहेबराव बांबळे, शिवाजी गाढवे, गणेश टोचे आदींसह इतर पदाधिकारी.