कोरोना प्रतिबंधासाठी सरसावले आयुर्वेद व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:37 AM2020-05-17T00:37:28+5:302020-05-17T00:37:49+5:30
नाशिक : कोरोनाशी लढा देताना अन्य वैद्यकीय व्यावसायिकांना साथ देण्यासाठी आयुर्वेद व्यासपीठ सरसावले आहे.
नाशिक : कोरोनाशी लढा देताना अन्य वैद्यकीय व्यावसायिकांना साथ देण्यासाठी आयुर्वेद व्यासपीठ सरसावले आहे. कोरोना होऊच नये यासाठी शासनाच्या आरोग्य सेवकांच्या बरोबरीने क्वारंटाइन क्षेत्रात जाऊन घरोघरी आयुर्वेदीय उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
यासंदर्भात आयुर्वेद व्यासपीठाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. शासनाला मदत करण्यासाठी राज्यातील ७० हजार आयुर्वेद पदवीधारक, दोन हजार अध्यापक आणि पाच हजार विद्यार्थी शासनाला मदत करण्यास तयार आहेत. यात प्रामुख्याने क्वारंटाइन व्यक्तींवर आयुर्वेदीय उपचार, ज्या सोसायटी किंवा कॉलनीत कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे, त्या परिसरात अन्य व्यक्तींना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपचार, पुन्हा हा आजार होऊ नये यासाठी कोरोनामुक्तांवर उपचार या पद्धतीने सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.