सार्थकनगर-कैलासनगर पदपथास चौपाटीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:38 AM2019-07-09T00:38:02+5:302019-07-09T00:38:17+5:30

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर ते कैलासनगर या रस्त्यादरम्यान असलेले पदपथास चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.

 Sartank Nagar-Kalasnagar padyatthas Chowpatti Swaroop | सार्थकनगर-कैलासनगर पदपथास चौपाटीचे स्वरूप

सार्थकनगर-कैलासनगर पदपथास चौपाटीचे स्वरूप

Next

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर ते कैलासनगर या रस्त्यादरम्यान असलेले पदपथास चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील कलानगर ते पाथर्डीगाव या रस्त्याचे रखडलेले रुं दीकरण व डांबरीकरण सुमारे अडीच वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यावेळी रस्त्याच्या रु ंदीकरणास अडथळा ठरणारे व्यावसायिकांचे पत्राचे शेड पक्के ओटे यांसह अतिक्र मण पोलिसांचा फौजफाटा घेऊन काढण्यात आली होते. या रस्त्यालगतच सार्थकनगर, कैलासनगर, पांडवनगरी, सराफनगर, शरयूनगर यांसह विविध उपनगरे असल्याने परिसरातील नागरिकांना नोकरी व्यवसायासाठी ये-जा करण्यासाठी वडाळा-पाथर्डी रस्त्याचाच वापर करावा लागतो.
अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यातच या रस्त्यालगतच प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालय असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वर्दळ असते. परंतु सायंकाळ होताच सहा वाजेच्या दरम्यान सार्थकनगर ते कैलासनगर या वडाळा-पाथर्डी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावर खाद्यपदार्थ, फळभाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या लागतात त्यामुळे सायंकाळ होतात चौपाटीचे स्वरूप प्राप्त होते. त्यांच्याकडे येणारे ग्राहक आपली वाहने सर्रासपणे रस्त्यावर उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. फेरफटका मारणाऱ्यांना पदपथाअभावी जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून मार्गक्र मण करावा लागतो. त्यातूनच लहान-मोठे अपघात घडतात. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रभागाचे नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी प्रभाग सभेत अनेक वेळेस प्रशासनाला अतिक्र मणाच्या मुद्द्यावरून धारेवर धरले तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. अतिक्र मण विभाग सायंकाळ येत नाही याचाच फायदा उठवतात. हळूहळू परिसरात चौपाटीचे रूप प्राप्त होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नाही.
सदर रस्त्यावर सायंकाळ होताच खाद्यपदार्थांच्या गाड्या लागतात. सदर खाद्यपदार्थ खाण्यासाठी ग्राहकांना बसण्यासाठी पदपथावर खुर्च्या टाकल्या जातात. त्यामुळे सायंकाळी आणि ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारला जातो. तेव्हा मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता टाळता येत नाही.
- प्रकाश मालपाठक, ज्येष्ठ नागरिक
सदर रस्ता खाद्यपदार्थ विक्रे त्यांसाठी आहे की वाहतुकीसाठी याचा खुलासा महापालिकेने लगतच असलेल्या अपार्टमेंटमधून नागरिकांना बाहेर निघणे सुद्धा मुश्किल झाले आहे. तातडीने वाहतुकीचा रस्ता मोकळा करावा.
- अशोक लोळगे, नागरिक

Web Title:  Sartank Nagar-Kalasnagar padyatthas Chowpatti Swaroop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.