शिक्षण हक्क प्रवेशप्रक्रिया २४ पासून शक्य सर्व शिक्षा अभियान : २५ टक्के राखीव प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:39 AM2018-01-06T01:39:16+5:302018-01-06T01:41:49+5:30
नाशिक : शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार दरवर्षी राबविण्यात येणारी २५ टक्के राखीव कोट्यातील प्रवेशप्रक्रिया येत्या २४ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
नाशिक : शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार दरवर्षी राबविण्यात येणारी २५ टक्के राखीव कोट्यातील प्रवेशप्रक्रिया येत्या २४ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत कोणतीही घोषणा झाली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागाने मोफत प्रवेशाची जोरदार तयारी चालविली असून, साधारणपणे महिन्याच्या तिसºया आठवड्यात प्रवेशप्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षीच्या त्रुटी यंदा येणार नाहीत याची विशेषत्वाने काळजी घेण्यात आली आहे. मागीलवर्षी नाशिक जिल्ह्यात ४५८ शाळांमध्ये ६,४३३ जागा उपलब्ध होत्या. यावर्षी यात वाढ होण्याची शक्यता आहे. सन २०१८-१९या शैक्षणिक वर्षासाठी जानेवारीतच प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इयत्ता पहिली व नर्सरीतील पटसंख्येच्या २५ टक्के जागा या समाजातील एस.टी, एस.सी व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवल्या जातात. या जागांवर आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जातात व संगणकीय लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. गेल्या तीन वर्षांपासून २५ टक्के कोट्यातील प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत असल्याने दरवर्षी अर्ज करणाºयांची संख्या वाढतच आहे. असलेल्या जागांच्या तीनपट अधिक अर्ज दाखल होत असल्याचा अनुभव असल्याने प्रवेशसाठी मोठी चुरस निर्माण होते. त्यामुळे पालकांनी परिपूर्ण आणि योग्य माहिती भरून अर्ज सादर केल्यास त्यांना प्रवेशासाठी सुलभता होणार आहे. सदर आॅनलाइन प्रक्रियेत यंदा काही बदल करण्यात आले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना लॉटरी लागलेल्या शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त दहा शाळांकरिता अर्ज करता येणार आहे. एका विद्यार्थ्याची केवळ एकाच शाळेत लॉटरी लागणार आहे. दिलेल्या मुदतीत आणि लॉटरी लागलेल्या शाळेतच विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. सदर शाळेत प्रवेश घेतला नाही, तर पुढील सर्व फेºयातून विद्यार्थी बाद होणार आहे.