बिबट्याकडून दोन बक-यांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:27 PM2017-11-24T14:27:23+5:302017-11-24T15:45:59+5:30
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथे एकाच आठवड्यात बिबट्याने दुस-यांदा हल्ला करून दोन बक-यांचा दिवसा फडशा पाडला.
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथे एकाच आठवड्यात बिबट्याने दुस-यांदा हल्ला करून दोन बक-यांचा दिवसा फडशा पाडला. येथे त्वरीत पिंजरा लावण्याची मागणी सरपंच सुशिला साबळे , उपसरपंच लालमन कातोरे, भिमा साबळे तसेच ग्रांमपंचायत सदस्यांनी केली आहे. तालुक्याच्या पुर्व भागात सध्या उसतोड चालु आहे. भाताचीही सोंगणी सुरू असल्याने सर्वत्र मोकळे रान होत आहे. यामुळे बिबटे लपण्यासाठी व भक्षासाठी लोकवस्तीकडे येत आहेत. अडसरे बुद्रुकच्या वनदेव टेकडी जवळ नंदू लोहरे यांची एक शेळी व एक बोकड बिबट्याने मारले. आरडा ओरडा करून काहीही फायदा झाला नाही. शेवटी या गरीब आदिवासी कुटुंबाचे दहा हजाराचे नुकसान झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पंचनामा वनविभागाचे जाधव व पाठक यांनी केला.