आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सासरच्या मंडळीला शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:20 AM2019-11-20T01:20:35+5:302019-11-20T01:21:25+5:30
दुसरा मुलगा लवकर होऊ द्यावा, यासाठी सासरच्या मंडळीने विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ केला. त्या छळास कंटाळून विवाहितेने ११ सप्टेंबर २०१६ साली आत्महत्या केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्यावर सुनावणी होऊन मंगळवारी (दि.१९) न्यायालयाने पती, सासू-सासऱ्यांना सात महिन्यांचा कारावास व १५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
नाशिक : दुसरा मुलगा लवकर होऊ द्यावा, यासाठी सासरच्या मंडळीने विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ केला. त्या छळास कंटाळून विवाहितेने ११ सप्टेंबर २०१६ साली आत्महत्या केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्यावर सुनावणी होऊन मंगळवारी (दि.१९) न्यायालयाने पती, सासू-सासऱ्यांना सात महिन्यांचा कारावास व १५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. आगरटाकळी रस्त्यावरील ड्रिम सिटीमध्ये राहणाºया शैलजा मनीष शाही हिला दुसरा मुलगा लवकर होऊ द्यावा, यासाठी तिचा छळ सुरू होता. तसेच स्री-धन काढून घेऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. तिने विवाह झाल्यापासून दोन वर्षांनंतर आपले जीवन संपविले. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित आरोपी पती मनीष अंजनीनंदन शाही, सासरे अंजनीनंदन भैरवलाल शाही, सासू किरण अंजनीलाल शाही यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन उपनिरीक्षक एल. बी. कारंडे यांनी तपास करत सबळ पुरावे गोळा करून गुन्हा सिद्ध होण्यासाठी दोषारोपपत्र दाखल केले.
तीन वर्षांनंतर यावर अंतिम निर्णय देत न्यायालयाने संशयितांना दोषी धरले. न्यायाधीश एस. एस. नायर यांनी या गुन्ह्यातील मयत विवाहितेचा पती मनीषसह सासू-सासऱ्यांना पंचांची साक्ष, परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे दोषी ठरवून ७ वर्षांचा कारावास आणि १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षाची बाजू अॅड. रेवती कोतवाल यांनी मांडली.