सासूरवाशिणीला मिळाली माहेरची माया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 09:01 PM2020-06-03T21:01:32+5:302020-06-04T00:41:13+5:30
खामखेडा : एकीकडे हुंड्यासाठी महिलांचा शारीरिक, मानसिक त्रास होणाऱ्या घटना घडत असताना सासूरवाशिणीला माहेरच्यांसारखी माया देणारेही पहावयास मिळाले. इतकेच नव्हे तर मुलीप्रमाणे तिचा सत्कार करून सन्मानही केला.
खामखेडा : एकीकडे हुंड्यासाठी महिलांचा शारीरिक, मानसिक त्रास होणाऱ्या घटना घडत असताना सासूरवाशिणीला माहेरच्यांसारखी माया देणारेही पहावयास मिळाले. इतकेच नव्हे तर मुलीप्रमाणे तिचा सत्कार करून सन्मानही केला. त्याचे झाले असे की, सावकी येथील सासर असलेल्या व सध्या मालेगावी येथील आरोग्य विभागात नोकरीस असणाºया अधिपरिचारिका अश्विनी पवार या सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात कर्तव्यावर जाताना सावकीच्या ग्रामस्थांकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना भारावलेल्या मनाने सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. अश्विनी पवार यांचे सासर देवळा तालुक्यातील सावकी येथील आहे. त्या मालेगावातील आयएमएएचपी रुग्णालयात अधिपरिचारिका या पदावर काम करतात. त्याचे संपूर्ण कुटुंब सावकी येथे वास्तव्यास आहे. त्या यापूर्वी सावकी येथून कर्तव्यावर ये-जा करत असत. त्यामुळे कुटुंबापासून लांब राहाण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता. परंतु मालेगावात कोरोना विषाणूने शिरकाव केला अन् बघता बघता काही दिवसातच मालेगाव शहर कोरोना हॉटस्पॉट म्हणून परिचित झाले.
मालेगावात काम करत असताना मोठ्या प्रमाणात डॉक्टर, पोलीस तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी बाधित होऊ लागल्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली. या कारणाने कर्मचाºयांना सुटी मिळणेदेखील दुरापास्त झाले. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून अश्विनी कोरोनाच्या सावटात आपले कर्तव्य अविरतपणे पार पाडत होत्या. एरवी सावकी येथून ये-जा करणाºया अश्विनी पहिल्यांदाच इतक्या दिवस कुटुंबापासून लांब राहिल्या. त्यात पुन्हा घरी परत येऊ की नये याची धास्ती. कुटुंबाशी फोनवर बोलणे व्हायचे; परंतु प्रत्यक्षात भेटण्याची ओढ लागली होती.
अखेर दोन-अडीच महिने सेवा बजावल्यानंतर सुट्टी मिळाली. तत्पूर्वी त्यांच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तरीही काही दिवस क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये त्यांना राहावे लागले. तो कालावधी संपल्यानंतर त्या सावकी येथील आपल्या मूळ गावी म्हणजे सासरी परतल्या. कुटुंबातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी ‘कोरोना योद्धा’ म्हणून त्यांचे जोरदार स्वागत केले.
कुटुंबासमवेत वेळ घालवल्यानंतर सहा दिवस विश्रांतीनंतर आज पुन्हा रु ग्णसेवा हाच आपला धर्म मानत आपल्या मालेगाव येथील मूळसेवेत रुजू होण्यासाठी निघाल्या असता यावेळी सावकी ग्रामपंचायतीकडून त्यांचा सत्कार करत ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून भारावलेल्या मनाने सन्मानपूर्वक निरोप दिला. यावेळी सावकीचे उपसरपंच अरुण पाटील, ग्रामसेवक वैशाली पवार, ग्रामपंचायत सदस्य कारभारी पवार, राजाराम गोधडे, उशाबाई सोनवणे, अक्काबाई गायकवाड, अहिल्याबाई पवार, पोलीसपाटील अश्विनी बच्छाव, नीलेश पाटील, केवळ भामरे, आरोग्यसेवक दिनेश शेवाळे, आरोग्य सहाय्यक संजय कुंभार्डे, आरोग्यसेविका रंजना वळवी आदी उपस्थित होते.
------------------
पहिल्यांदाच घरापासून इतक्या दिवस लांब राहिले. त्यात पुन्हा घरी परत येऊ की नाही ही धास्ती होती. आपल्यावर संपूर्ण कुटुंब भावनिकरीत्या अवलंबून असताना आपण सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे. आयुष्यातील या दोन-अडीच महिन्यांत जगण्याचा खरा अर्थ नव्याने समजला. आज कामावर पुन्हा रु जू होत असून, रु ग्णसेवा हाच आपला धर्म मानत अविरतपणे काम करत राहणार आहे.
- अश्विनी पवार, अधिपरिचारिका