सटाण्यात कांद्याला ११११ रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:19 AM2017-07-27T01:19:57+5:302017-07-27T01:20:10+5:30
सटाणा : येथील बाजार समिती आवारात उन्हाळ कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात प्रती क्विंटल दीडशे ते दोनशे रु पयांनी वाढ झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : येथील बाजार समिती आवारात उन्हाळ कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात प्रती क्विंटल दीडशे ते दोनशे रु पयांनी वाढ झाली आहे. बुधवारी (दि.२६) उन्हाळ कांद्याला प्रती क्विंटल सर्वाधिक ११११ रु पये भाव मिळाला. दरम्यान पावसामुळे यंदा पावसाळी कांद्याची लागवड देखील उशीरा झाल्यामुळे उन्हाळ कांद्याचे दर दीड हजारी ओलांडण्याची शकता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्यामुळे उत्पादनातही कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कांद्याची साठवणूक करूनही तो माती मोल भावाने विकावा लागत आहे. कांद्याचे दर खाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्कील झाले आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे.मात्र यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन सरासरी एवढे असले तरी कर्नाटक ,मध्यप्रदेश ,राज्यस्थान या राज्यांसोबातच महाराष्ट्रात पावसाळा तब्बल दीड महीना लेट झाल्यामुळे पावसाळी कांद्याची लागवड देखील उशिराने झाली. परिणामी उन्हाळ कांद्याच्या मागणीत वाढ होऊन आवकेत मात्र घट झाल्याने गेल्या दोनच दिवसात उन्हाळ कांद्याच्या भावात प्रती क्विंटल दीडशे ते दोनशे रु पयांनी वाढ झाली आहे. बुधवारी सटाणा बाजार समिती आवारात साडे चारशे वाहनातून सरासरी बारा हजार क्विंटल इतकी कांद्याची आवक होती.आज सर्वाधिक ११११ रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला.तर कमीत कमी साडे तीनशे व सरासरी ९५० रु पयांनी कांदा विकला गेला. डाळिंबाचे दर घसरले
तेल्या रोगाच्या आक्र मणामुळे डाळिंबाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसमादे पट्यात डाळिंबाच्या क्षेत्रात तब्बल ७५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनातही घट झाली आहे. असे असतांना डाळिंब कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी सटाणा बाजार समिती आवारात डाळिंबाच्या साडे चार हजार क्र ेट इतकी आवक होती.भगव्या डाळिंबाने भावात प्रती किलो शंभरी ओलांडून १०५ रु पये भाव मिळविला. मात्र चार दिवसात डाळिंबाची आवक दोन हजार क्र ेट ने वाढल्याने भाव निम्म्याने घसरले आहेत. बुधवारी ६२०० क्र ेट इतकी आवक होती. प्रती किलो सर्वाधिक ६२ भाव मिळाला तर सरासरी ४०रु पये भाव मिळाला .शेतकऱ्यांनी डाळिंब विक्र ीसाठी आणतांना प्रतवारी करूनच आणावा असे आवाहन सभापती रमेश देवरे ,सचिव भास्करराव तांबे यांनी केले आहे. जुलै व आॅगष्ट या दोन मिहन्यात कांदा विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. हे अनुदान नुकतेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आले असून लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रि या सुरु करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी सटाणा सहाय्यक निबंधक कार्यालय व सटाणा बाजार समिती कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिव तांबे यांनी केले आहे.