सटाणा पोलीस ठाण्यातील नाइकास लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:08 PM2018-12-14T23:08:10+5:302018-12-15T00:21:26+5:30
दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात तक्रारदारास अटकेची भीती घालून आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करून सटाणा पोलीस ठाण्यात रक्कम स्वीकारणारे पोलीस नाईक संशयित केशव सुदाम सूर्यवंशी (बक्कल नंबर १७२०) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़१४) रंगेहाथ पकडले़
नाशिक : दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात तक्रारदारास अटकेची भीती घालून आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करून सटाणा पोलीस ठाण्यात रक्कम स्वीकारणारे पोलीस नाईक संशयित केशव सुदाम सूर्यवंशी (बक्कल नंबर १७२०) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़१४) रंगेहाथ पकडले़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सटाणा पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मित्राविरोधात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्णाचा तपास करणारे केशव सूर्यवंशी यांनी यापूर्वी त्यास अटकही केली होती़ या दुचाकीचोरीच्या गुन्ह्णात तक्रारदारास अटक करणार असल्याचे सांगून या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली होती़ त्यानुसार या तक्रारीची पडताळणी करून शुक्रवारी सटाणा पोलीस ठाणे आवारात सापळा लावण्यात आला होता़
सटाणा पोलीस ठाण्यात तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी रक्कम स्वीकारताच पोलीस नाईक केशव सूर्यवंशी यास रंगेहाथ पकडण्यात आले़ याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़