सटाणा महाविद्यालय सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:14 AM2017-09-01T00:14:06+5:302017-09-01T00:14:23+5:30
शहरातील आबासाहेब सोनवणे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचा वार्षिक स्नेहमेळावा नुकताच महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण होत असून, आगामी वर्ष हे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या वर्षात संघातर्फे विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सटाणा : शहरातील आबासाहेब सोनवणे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचा वार्षिक स्नेहमेळावा नुकताच महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण होत असून, आगामी वर्ष हे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या वर्षात संघातर्फे विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
येथील महाविद्यालयाच्या हॉलमध्ये संपन्न झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष व कॉँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे, उपप्राचार्य शांताराम गुंजाळ, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, विश्वास चंद्रात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी किशोर कदम, शैलेश सूर्यवंशी, रामदास पाटील, प्रा.कल्पना भदाणे, प्रा.डॉ.संतोष ठाकरे, वैभव धामणे, दत्ता साठे, शशिकांत कापडणीस, सतीश चिंधडे, निखिल शिरोडे, एच.पी.गुंजाळ, किरण दशमुखे, प्रा. सुनीता शेवाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास डॉ.अमरनाथ पवार, पंजाबराव देशमुख, डॉ.दिनेश बिरारी, प्रा.मोहन परदेशी, अमोल अलई, महेश देशमुख, प्रा.पल्लवी खैरनार, प्रा.बी.आर.पवार, प्रा.पी.डी.भदाणे, प्रा.दिनकर पवार, मोहन सोनवणे, भरत खैरनार, वैभव गांगुर्डे, प्रसाद पवार, संगीता देसले, भारती मोरे, राजेंद्र देवरे, संध्या धोत्रे, हेमंत देवरे, युवराज सोनवणे, सुनील खैरनार आदी उपस्थित होते.