सटाणा : शेतकऱ्यांची उपविभागीय कृ षी अधिकाºयांकडे मागणी सदोष बियाणांमुळे कांद्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:48 AM2018-04-07T00:48:20+5:302018-04-07T00:48:20+5:30
सटाणा : सदोष कांदा बियाण्यामुळे दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला नुसते टोंगळे आले आहेत. उत्पादनात घट होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
सटाणा : सदोष कांदा बियाण्यामुळे दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला नुसते टोंगळे आले आहेत. उत्पादनात घट होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, संबंधित कंपनीने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बागलाण तालुक्यातील पारनेर येथील शेतकरी जालिंदर देवरे यांनी मालेगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांच्याकडे केली आहे. पारनेर येथील शेतकरी जालिंदर देवरे यांनी मालेगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. १५ सप्टेंबर २०१७ रोजी एका कंपनीचे कांदा बियाणे वाण खरेदी केले होते. पाचशे ग्रॅम वजनाची सात पाकिटे घेतल्ीे. त्याची रोपे तयार करून ८ डिसेंबर २०१७ रोजी कांद्याची लागवड केली. सुमारे साठ हजार रुपयांचे कांदा पीक उभे केले; मात्र सदोष बियाण्यामुळे त्याला अक्षरश: टोंगळे फुटले आहेत. त्यामुळे कांदा पिकाची वाढ खुंटून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशा आशयाची तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, देवरे यांच्या तक्रारीची दखल घेत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष कैलास खैरनार, तालुका कृषी अधिकारी दिलीप कापडणीस, बियाणे महामंडळाचे डॉ. जे. के. ढेभरे, कृषी अधिकारी प्रणय हिरे यांनी पिकाची पाहणी केली.