सटाणा पालिकेची पाइपलाइन फुटली

By admin | Published: December 19, 2014 11:17 PM2014-12-19T23:17:56+5:302014-12-19T23:44:34+5:30

सटाणा पालिकेची पाइपलाइन फुटली

Satana municipal pipeline spills | सटाणा पालिकेची पाइपलाइन फुटली

सटाणा पालिकेची पाइपलाइन फुटली

Next

ठेंगोडा : सटाणा नगर पालिकेची पाईपलाई फुटल्याने ठेंगोडा येथील गणेशनगर परिसरात गेल्या महिन्यांभरापासून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.या कडे संबंधीत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
साधारणपणे तीन इंची पाइपच्या आकाराचे हे पाणी गेल्या महिनाभरापासून रात्रंदिवस सारखे वाहत आहे. सुरु वातीस कुण्या शेतकऱ्यांच्या पाइपलाइनचे पाणी असावे, असा कयास लावण्यात येत होता. संबंधित शेतकऱ्यांना माहिती झाल्यावर पाण्याचा विसर्ग थांबेल, असा अंदाज ग्रामस्थांमध्ये लावला जात होता. मात्र महिना उलटूनही सदर पाण्याचे लिकेज काढण्यास कुणीही पुढे न आल्याने हे पाणी नेमके कुणाचे याबाबत तर्क वितर्क केले जात होते. परिसरातील शेतकरी व सटाणा नगरपालिकेसही याबाबत कळविण्यात आले. मात्र सदर पाणी आपल्या पाइपलाइनचे नसल्याचे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र पाणी वाहण्याचे थांबत नसल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घरांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली. २४ तास वीज केवळ सटाणा पालिकेचीच असल्याने हे पाणी सटाणा नगर पालिकेच्या पाईपलाईनचेच असल्याचा अंदाज बांधत ठेंगोडा ग्रामपंचायतीने संबंधित पाइपलाइनला बुच लावण्याचा इशारा देताच सटाणा नगरपालिकेने लिकेज काढले. परंतु थातूरमातूर उपाययोजना केल्याने रात्रीतून पाइपलाइन पुन्हा लिकेज होऊन हजारो लिटर पाणी वाहू लागले. सतत महिनाभरापासून वाहत असलेल्या या पाण्यामुळे परिसरातील मोकळ्या जागेवर पाणीच पाणी साचले आहे. त्याचबरोबर साचलेल्या पाण्यात परिसरातील मोकाट जनावरे - डुकरे मनसोक्त वावरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याची टंचाई व दुष्काळसदृश स्थिती असतानाही सटाणा पालिकेचे लिकेजकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत ठेंगोडा ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Satana municipal pipeline spills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.