सटाणा पोलिसांचे विद्यार्थ्यांना समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:28 AM2021-02-21T04:28:17+5:302021-02-21T04:28:17+5:30
सटाणा पोलीस ठाण्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थी समुपदेशन अभियानअंतर्गत येथील 'मविप्र' संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात ...
सटाणा पोलीस ठाण्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थी समुपदेशन अभियानअंतर्गत येथील 'मविप्र' संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून गायकवाड बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती एस.बी.मराठे तर उपमुख्याध्यापक संजय सोनवणे, पर्यवेक्षक डी.एस. सावंत, के.एस. हिरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, विद्यार्थी जीवनात विद्यार्थी होऊनच जगलं पाहिजे. विद्यार्थी दशेत भरपूर वाचन करून जीवनात यशस्वी व्हावे. आज सर्वत्र सोशल मीडियाचा अतिरेक वाढल्याने समाजाला अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थिनींनी स्वत:चे संरक्षण करण्यास शिकले पाहिजे. चुकीची संगत आणि खोट्या आमिषांना बळी पडून मुलींचे घरातून पळून जाण्याचे वाढलेले प्रमाण चिंताजनक आहे. विद्यार्थिनींनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाबाबत तत्काळ शाळा आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहनही गायकवाड यांनी केले.
प्राचार्या श्रीमती एस.बी.मराठे यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक डी.एस.सावंत यांनी आभार मानले.
कोट....
बागलाण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विविध आमिषांना बळी पडून अल्पवयीन मुलींचे घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र आजच्या विद्यार्थिनींना समुपदेशनाची खरी गरज असल्याने सटाणा पोलीस ठाण्यातर्फे विशेष अभियान सुरू केले असून याअंतर्गत तालुक्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे समुपदेशन केले जात आहे.
- नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक
फोटो- २० नंदकुमार गायकवाड
===Photopath===
200221\20nsk_21_20022021_13.jpg
===Caption===
फोटो- २० नंदकुमार गायकवाड