सटाणा रोटरी क्लब ,इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:58 PM2019-07-12T12:58:49+5:302019-07-12T12:59:03+5:30
सटाणा : कोणतेही काम करताना आत्मविश्वास असणे फार महत्वाचे असते. कारण स्वत:वर विश्वास असेल तर यश आपोआपच मिळते. आत्मविश्वास हीच यशाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जर व्यक्तिमत्व सुधारायचे असेल आणि यश खेचून आणायचे असेल तर आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. असे प्रतिपादन व्यक्तिमत्व प्रशिक्षिका मधुरा क्षेमकल्याणी यांनी केले.
सटाणा : कोणतेही काम करताना आत्मविश्वास असणे फार महत्वाचे असते. कारण स्वत:वर विश्वास असेल तर यश आपोआपच मिळते. आत्मविश्वास हीच यशाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जर व्यक्तिमत्व सुधारायचे असेल आणि यश खेचून आणायचे असेल तर आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. असे प्रतिपादन व्यक्तिमत्व प्रशिक्षिका मधुरा क्षेमकल्याणी यांनी केले.
येथील रोटरी क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन व इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित पदग्रहण समारंभ कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्षेमकल्याणी बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुनील मोरे, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मांडलेचा, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, डिस्ट्रिक गव्हर्नरराजेंद्र भामरे, गिरिषा ठाकरे, विलास शिरोरे, यशवंत अमृतकर होते. रोटरी मिडटाऊनच्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे सचिन दशपुते यांनी मावळते अध्यक्ष विवेक जगताप यांच्या कडून स्वीकारले तर नूतन सचिवपदाची सूत्रे विद्या अमृतकार यांनी स्वीकारले तसेच इनरव्हील क्लब च्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे स्मिता येवला यांनी मावळत्या अध्यक्ष रूपाली कोठावदे यांच्या कडून स्वीकारले. सचिवपदाची सूत्रे रूपाली जाधव यांनी स्वीकारली. महालक्ष्मी देवी मंदिराचे अध्यक्ष सुरेश येवला, पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बधान, दत्तात्रय कोठवदे यांच्या सामाजिक कार्याबद्दल व रोटरी पाल्यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. व्यापारी असोसिएशनच्यावतीने दिलीप चव्हाण यांनी संतोष मंडलेचा यांचा सत्कार केला. कार्यक्र मास जगदीश मुंडावरे, अमोल अंधारे, अतुल पाटील, चंद्रकांत विखंकर, मनोज येवला, परेश कोठावदे, प्रकाश सोनग्रा, राहुल जाधव, संजय नेरकर, संजय येवला, सुरेश येवला, अँड.अभिमन्यू पाटील, रु पाली पंडित, नयन कोठावदे, रूपाली निकुंभ, रेखा वाघ,मीनल मुंडावरे, संगीता खानकरी, अर्चना सोनवणे, सुनिता धोंडगे, सुनिता महाजन, साधना पाटील, आदि उपस्थित होते.प्रास्ताविक विवेक जगताप यांनी केले. सूत्रसंचालन तुषार महाजन यांनी केले तर आभार विद्या अमृतकार यांनी मानले.