सटाणा शहरात अचानक नगराध्यक्षांकडून स्वच्छतेची पाहणी : कर्मचाऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:35 AM2020-01-08T00:35:09+5:302020-01-08T00:38:49+5:30

सटाणा : शहरात विविध विकासकामे सुरू असतानाच नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दैनंदिन स्वच्छता व आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष दिले आहे. सोमवारी (दि.6) नगराध्यक्षांनी पहाटे पाच वाजताच शहरात अचानक फेरफटका मारून स्वच्छता कर्मचार्यांच्या कामकाजाची पाहणी केली. एवढेच नव्हे तर देव मामलेदार यात्रोत्सव मैदानात जाऊन व्यावसायिकांशी संवाद साधून नगराध्यक्षांनी स्वच्छतेबाबतचा आढावा घेतला.

SATANNA City suddenly seeks cleanliness from city president: staff rush | सटाणा शहरात अचानक नगराध्यक्षांकडून स्वच्छतेची पाहणी : कर्मचाऱ्यांची धावपळ

सटाणा: शहरातील स्वच्छतेची अचानक भल्या पहाटे पाहणी करून यात्रा उत्सवातील व्यावसायिकांशी संवाद साधताना नगराध्यक्ष सुनील मोरे, समवेत आरोग्य सभापती दिनकर सोनवणे, नगरसेवक दीपक पाकळे आदि.

Next
ठळक मुद्देयात्रोत्सवाबाबत त्यांच्या भावना समजून घेतल्या.

सटाणा : शहरात विविध विकासकामे सुरू असतानाच नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दैनंदिन स्वच्छता व आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष दिले आहे. सोमवारी (दि.6) नगराध्यक्षांनी पहाटे पाच वाजताच शहरात अचानक फेरफटका मारून स्वच्छता कर्मचार्यांच्या कामकाजाची पाहणी केली. एवढेच नव्हे तर देव मामलेदार यात्रोत्सव मैदानात जाऊन व्यावसायिकांशी संवाद साधून नगराध्यक्षांनी स्वच्छतेबाबतचा आढावा घेतला. या अचानक दिलेल्या भेटीमुळे कर्मचार्यांची तारांबळ उडाली होती. सटाणा नगर परिषदेकडून सध्या शहरात विविध विकासकामे सुरू आहे. 51 कोटी रु पयांची पुनद पाणीपुरवठा योजना, नानानानी पार्क, स्कायवॉक, रिंगरोड, बायोमायनिंग आदि कामे प्रगतिपथावर आहेत.दुसरीकडे नगरपरिषदेने स्वच्छता आण िआरोग्याकडेही अतिशय गांभीर्यापूर्वक लक्ष दिले आहे. त्यामुळेच शहराने राष्ट्रीय पातळीवरील ए स्टार मानाकंन प्राप्त केले आहे.सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामिगरीच्या बळावर नगरपरिषदेने थ्री स्टार मानांकनासाठी दावेदारी केली आहे. त्यानुसार सर्व कामकाज सुरळीतपणे चालते की नाही? याची खातरजमा करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे व पदाधिकार्यांकडून अचानक प्रत्यक्ष स्थळावर भेट देऊन पाहणी केली जात आहे. त्यानुसार शहरात यात्रा उत्सवाची धामधुम सुरू असतानाच नगराध्यक्षांनी पदाधिकार्यांसमवेत सोमवारी (दि.6) भल्या पहाटे पाच वाजताच शहरातून फेरफटका मारून पाहणी केली.
सर्वप्रथम नगराध्यक्षांनी स्वच्छता मुकादम किशोर सोनवणे, बजरंग काळे, खलील पटेल यांच्याकडून कामकाजाचे नियोजन समजून घेतले. त्यानुसार प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन संबंधित कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडतात का? याची नगराध्यक्षांनी खातरजमा केली.
शहरातील पाहणी करतांनाच नगराध्यक्षांनी अचानक आपला मोर्चा यात्रा मैदानाकडे वळविला. याठिकाणी दैनंदिन स्वच्छतेबाबत थेट व्यावसायिकांकडूनच विचारपूस केली.यावेळी नगराध्यक्षांनी बाहेरगावाहून आलेल्या व्यावसायकांसोबत शेकोटीचा आनंद घेत यात्रोत्सवाबाबत त्यांच्या भावना समजून घेतल्या.
यानंतर नगराध्यक्षांनी नगरपरिषद कार्यालयात जाऊन हजेरी पत्रक तपासले. वाहनतळावर जाऊन वाहनचालकांकडून कामकाज व वाहनांच्या अडी अडचणींबाबत विचारपूस केली. अगदी भल्या पहाटे नगराध्यक्षांचा दौरा पाहून अनायसेच कर्मचारी आवाक झाले आण ित्यांची चांगलीच तारांबळही उडाल्याचे दिसून आले.
परंतु यावेळी नगराध्यक्षांनी कर्मचाऱ्यांसमवेत आस्थेने संवाद साधताना आवश्यक सूचनाही केल्या. या अचानक भेटी देताना नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या समवेत आरोग्य सभापती दिनकर सोनवणे, नगरसेवक दीपक पाकळे, सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर, अ‍ॅड. दीपक सोनवणे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: SATANNA City suddenly seeks cleanliness from city president: staff rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.