कर वसुलीसाठी सटाणा पालिकेची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:47 PM2018-03-24T12:47:00+5:302018-03-24T12:47:00+5:30
सटाणा : येथील पालिका प्रशासनाने यंदा कर वसुलीचा लक्षांक पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.या पथकाने काही मुजोर मालमत्ता धारकांना वठणीवर आणून कर वसुलीसाठी भोंगा, ढोलताशा बडवला जात आहे.
सटाणा : येथील पालिका प्रशासनाने यंदा कर वसुलीचा लक्षांक पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.या पथकाने काही मुजोर मालमत्ता धारकांना वठणीवर आणून कर वसुलीसाठी भोंगा, ढोलताशा बडवला जात आहे. पालिका प्रशासनाच्या या अनोख्या फंडयामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने शहरातील मालमत्ता धारकांकडून पाणीपट्टी ,घरपट्टी रूपाने तब्बल ९६ टक्के कर वसुली करून विक्र म केला होता.यंदा मात्र पालिका प्रशासनाला लक्षांक पूर्ण करतांना चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे.लक्षांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी विशेष पथक तयार करून धडक मोहीम हाती घेतली आहे.पालिकेचे वसुली निरीक्षक जितेंद्र केदारे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने प्रथम थकबाकीदार मालमत्ता धारकांची नावे असलेला डिजिटल फलक चौकाचौकात लावण्यात आला.तरी देखील कर भरण्यासाठी मालमत्ता धारकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने या पथकाने मालमत्ता धारकांच्या घराजवळ भोंगे तसेच ढोलताशा बडवून वसुली केली जात आहे.या वसुली मोहिमेमुळे अनेकांची धडकी भरली आहे.कार भरण्यासाठी प्रतिसाद न दिल्यास मालमत्ता सील करणे ,नळ जोडण्या बंद करण्यात येऊन काहींच्या मालमत्ता देखील जप्त करण्यात येत आहेत.