पेठ तालुक्यातील १४५ गावांतील शेतकऱ्यांचा सातबारा होणार अपडेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:33+5:302021-06-24T04:11:33+5:30

पेठ : सर्व शेतकऱ्यांचे सातबारा संगणकीकरण झाले असले तरी लिखित व संगणकीकरण यांच्यातील त्रुटी व दोष निवारण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत ...

Satbara update for farmers in 145 villages of Peth taluka! | पेठ तालुक्यातील १४५ गावांतील शेतकऱ्यांचा सातबारा होणार अपडेट !

पेठ तालुक्यातील १४५ गावांतील शेतकऱ्यांचा सातबारा होणार अपडेट !

Next

पेठ : सर्व शेतकऱ्यांचे सातबारा संगणकीकरण झाले असले तरी लिखित व संगणकीकरण यांच्यातील त्रुटी व दोष निवारण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत दि. २२ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान पेठ तालुक्यातील १४५ महसुली गावांमध्ये विशेष शिबिर घेऊन सातबारा अभिलेखातील त्रुटी दूर करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार संदीप भोसले यांनी दिली.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ चे अभियानांतर्गत हस्तलिखित मूळ सातबारा तसेच संगणकीकृत सातबारा तयार करताना त्यात झालेल्या हस्तदोष चुका दुरुस्तीकामी दि. २२ जूनपासून प्रत्येक गावी सातबारा संगणकीकरणांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण राज्यात महसूल दप्तरी सातबारा संगणकीकरणाची मोहीम सुरू आहे. याबाबत विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी यांनीही जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करणेबाबत सूचित केले होते. त्यानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, पेठ तालुक्यातील जनतेने त्यांच्याकडील कागदोपत्री पुराव्यांसह या शिबिरास मोठ्या संख्येने हजर राहून सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले यांनी केलेले आहे.

Web Title: Satbara update for farmers in 145 villages of Peth taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.