विश्वाचा शोध घेण्यासाठी सॅटेलाइट तंत्रज्ञान उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:11+5:302021-05-24T04:13:11+5:30
वैदिककाळापासून पृथ्वी असून ऋतू, नक्षत्र, शेतीचे हंगाम तेव्हाही होते. वेदांगकाळातही विज्ञान प्रगत होते, त्याचे कोनात्मक आणि कलात्मक परिणाम मिळत ...
वैदिककाळापासून पृथ्वी असून ऋतू, नक्षत्र, शेतीचे हंगाम तेव्हाही होते. वेदांगकाळातही विज्ञान प्रगत होते, त्याचे कोनात्मक आणि कलात्मक परिणाम मिळत गेले. त्यातून ६० पळे म्हणजे एक घटिका, ६० घटिका म्हणजे एक दिवस, ३० दिवस म्हणजे एक मास आणि १२ मास म्हणजे एक वर्ष...हे शोधले गेले.
आर्यभट्टांनी लावलेला शून्याचा शोध खगोलशास्राशी निगडित होता. धर्म आणि खगोलशास्राचे वितुष्ट बरेच काळ होते. कंकणाकृती ग्रहण पाहिल्याने समाजाने आर्यभट्टांवर बहिष्कार टाकल्याचे सुजाता बाबर यांनी सांगितले. बीजगणिताचे जनक भास्कराचार्य यांनी राहू, केतू हे बिंदू शोधून काढले. पायथागोरस सिद्धान्तानुसार ताऱ्यांचे अंतर मोजता आले. ॲरिस्टॉटलने पृथ्वी गोल असण्याचे संदर्भ दिलेत. गॅलिलिओने गुरूचे उपग्रह पाहिले, तर आइन्स्टाइन यांनीही मोठे योगदान दिल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले.
प्राचीन काळातच ताऱ्यांची नोंदणी झाली. दर्पणकार जांभेकर यांनी त्यांना मराठीत नावे शोधली. सप्तर्षी तारासमूहातून दिशा स्पष्ट होतात. राशी आणि नक्षत्र या भारतीय संकल्पना असून ऋतू-राशींचा जवळचा संबंध असल्याची माहिती बाबर यांनी दिली. विसाव्या शतकाच्या मध्यावर सॅटेलाइट तंत्रज्ञान जन्माला आले. त्यातूनच पुढे रशिया व अमेरिकेत शीतयुद्ध सुरू झाले. १९५६ साली रशियाने स्पुटनिक यान पाठविले, पण १३ वर्षांनंतर अमेरिकेने चंद्रावर माणूस उतरविला. भारतात इस्रो संस्था असून, सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा मोठा फायदा असल्याचे बाबर यांनी सांगितले. या क्षेत्रात करिअर करण्याची संधी म्हणून खगोलशास्राला नवी पिढी निवडू शकते, असा सल्लाही सुजाता बाबर यांनी दिला. यावेळी मालेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, मिलिंद बाबर उपस्थित होते. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.
आजचे व्याख्यान
वक्ते - सुनील कुटे
विषय - नाशिकचे पाणी